Surya Transit In Scorpio : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने त्यांच्या मित्र आणि शत्रू ग्रहाच्या राशीत प्रवेश करतात. ज्याचा परिणाम देश-विदेशातील लोकांच्या जीवनावर होतो. अशातच उद्या १७ नोव्हेंबर रोजी सूर्य त्याचा मित्र मंगळाच्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण ३ अशा राशी आहेत ज्यांचे नशीब या काळात चमकू शकते. तसेच, त्यांना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer Zodiac)
सूर्यदेवाचे गोचर कर्क राशीसाठी लाभदायक ठरू शकते. कारण सूर्यदेव तुमच्या राशीचे स्वामी चंद्राचे मित्र आहेत. तसेच त्यांचे गोचर तुमच्या राशीतून पाचव्या स्थानी होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, तुम्हाला प्रेमसंबंधात यश मिळू शकते. या काळात तुम्ही जी गुंतवणूक कराल, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. विवाहित लोकांना संतती सुखाची प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला सूर्यदेवाच्या कृपेने अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो.
मीन रास (Meen Zodiac)
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवाचा राशी बदल अनुकूल ठरू शकतो. कारण हे गोचर तुमच्या राशीच्या भाग्यस्थानी होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. आर्थिक बाबतीत हा काळ खूप फायदेशीर ठरु शकतो. तुम्ही जी गुंतवणूक कराल त्याचा तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तसेच, विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर असून त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- दिवाळी संपताच ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? मालव्य राजयोग बनल्यामुळे अचानक धनलाभाची शक्यता
तूळ रास (Tula Zodiac)
सूर्याचे गोचर तुमच्यासाठी खूप शुभ ठरु शकते. कारण हा योग तुमच्या राशीच्या धन स्थानी तयार होत आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने फायदेशीर ठरु शकतो. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. तसेच तुम्हाला मान-प्रतिष्ठा मिळेल आणि तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक तुमच्यापासून प्रभावित होऊ शकतात. सूर्यदेव तुमच्या राशीच्या उत्पन्न स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)