Surya Transit In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देव जवळपास एक महिन्यानंतर एका राशीतून दुसर्‍या राशीमध्ये गोचर करणार आहे. ग्रहांचे राजा सूर्य देव १३ फेब्रुवारी रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य देव कुंभ राशीमध्ये जवळपास एक वर्षानंतर गोचर करणार आहे. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि देव आहे अशात काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशीच्या लोकांना आकस्मिक धन लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ राशी (Taurus Zodiac)

सूर्य देवाचा गोचर वृषभ राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायासाठी लाभदायक ठरू शकतो. कारण सूर्य ग्रह या राशीच्या गोचर कुंडली करिअर आणि व्यवसायाच्या स्थानावर विराजमान होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांचे प्रमोशन होऊ शकते. व्यवसाय करणार्‍यांसाठी हा काळ उत्तम आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहे, त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. तसेच व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या लोकांवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. अडकलेले काम पूर्ण होईल. दीर्घ काळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होईल. येणारे दिवस लाभदायक ठरू शकतात.

मेष राशी (Aries Zodiac)

सूर्य देवाच्या राशी परिवर्तनाचा या लोकांना चांगला फायदा दिसून येईल. कारण सूर्य देव या राशीच्या इनकम भावामध्ये विराजमान होणार आहे. ज्यामुळे या लोकांच्या कमाईत वाढ होऊ शकते. तसेच इनकमचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. फ्रिलान्स किंवा पार्ट टाइममुळे अतिरिक्त पैसे मिळू शकतात. गुंतवणूकीतून या लोकांना लाभ मिळू शकतो. तसेच धनसंपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते. प्रतिस्पर्धी परीक्षेसाठी तयारी करत असाल तर मेहनतीचे फळ मिळेल. तसेच गुंतवणूकीतून लाभ मिळू शकतो. सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचे राशी परिवर्तन शुभ ठरू शकते. कारण सूर्य देव या राशीच्या चतुर्थ स्थानावर विराजमान होत आहे. ज्यामुळे या लोकांना भौतिक सुख प्राप्त होऊ शकते. तसेच या कालावधीत त्यांच्या आयुष्यात आनंद सुख समृद्धी दिसून येईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल. समाजात मान सन्मान वाढणार. तसेच वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करू शकतात.