Surya Nakshatra Parivartan: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन तसेच नक्षत्र परिवर्तन करतो. सूर्याच्या या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२५ मे रोजी सूर्याने कृतिका नक्षत्रातून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. सूर्य १५ दिवसांपर्यंत या नक्षत्रात उपस्थित असेल. सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश खूप खास मानला जातो. याचा प्रभाव काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असेल.

मेष

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन मेष राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास ठरेल. या काळात तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

हेही वाचा: ५ महिने शनि असणार वक्री; ‘या’ दोन राशींवर असणार लक्ष्मीची कृपा अन् ‘या’ दोन राशींना आर्थिक समस्या उद्भवणार

धनु

सूर्याचे नक्षत्रपरिवर्तन धनु राशींच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)