Aries To Pisces Horoscope Today : ३१ मार्च २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथीसकाळी ९ वाजून २२ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर तृतीया तिथी सुरू होईल. आज दुपारी १ वाजून ४६ मिनिटांपर्यंत वैधृती योग जुळून येईल. तसेच दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत अश्विनी नक्षत्र जागृत असणार आहे. चैत्र शुद्ध द्वितीय हा ‘श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन’ मानला जातो. म्हणजेच आज ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. तर स्वामींच्या आशीर्वादाने कोणत्या राशीच्या महिन्याचा शेवट गोड होणार हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

३१ मार्च पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Horoscope) :

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)

वाहन जपून चालवावे. डोके शांत ठेवून काम करावे. गरज पडल्यास चार पाऊले मागे यावे. लबाड लोकांपासून दूर राहावे. जोडीदाराचा आधार सुखावणारा असेल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)

व्यापारात चांगली प्रगती करता येईल. राहत्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. सत्संग सारख्या गोष्टीत मन रमेल. पित्ताचा त्रास वाढू शकतो. शक्यतो संघर्षाचे वातावरण टाळावे.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)

जवळच्या मित्रांच्या गाठी पडतील. आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. औद्योगिक चढउतार जाणवतील. पैसे गुंतवताना काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी आपली पत सांभाळावी.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)

भागीदारावर फार अवलंबून राहू नका. जोडीदाराच्या कलाने घ्यावे लागेल. लहान-सहान गोष्टीचा विपर्यास करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. चित्त स्थिर ठेवावे लागेल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)

व्यावसायिक वातावरणाचा अंदाज घ्यावा. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. मोठी उडी घेतांना विचार करावा. आवक-जावक याचा योग्य अंदाज घ्यावा. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)

शेजार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. स्वत:कडे दुर्लक्ष करू नये. मुलांना स्वच्छतेचे वळण लावावे. अति धाडस करू नये. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)

दिवस आनंदात जाईल. मन व बुद्धी यांचा समतोल राखावा. स्थावरचे काही प्रश्न उदभवू शकतात. घरगुती गैरसमज दूर करावेत. मुलांशी मतभेद होतील.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)

हातापायाला किरकोळ इजा संभवते. कामातील क्षुल्लक चुका टाळाव्यात. धोरणीपणाने वागावे लागेल. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. सकारात्मक विचार करावेत.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)

कौटुंबिक कामाची दगदग वाढेल. संभाषणाची आवड पूर्ण कराल. काही कामे खिळून पडतील. छोट्या कारणांवरून गैरसमज करून घ्याल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)

कामाचा व्याप वाढता राहील. व्यावसायिक उलाढाल वाढेल. प्रवासाची जोखीम शक्यतो घेऊ नये. चिकाटी सोडू नका. स्थावरची कामे मार्गी लागतील.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)

नातेवाईकांचा त्रास संभवतो. घरात शोभेच्या वस्तु आणाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल. आध्यात्मिक बळ वाढेल. वारसाहक्काची कामे मार्गी लागतील.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)

स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. स्वभावातील हेकेखोरपणा वाढू शकतो. प्रवासाचा आनंद घ्याल. मनावरील दडपण बाजूला सारावे. तुमच्या बोलण्याला धार येईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami samarth prakat din on 31 march 2025 with swamis blessings the end of the month will be sweet read horoscope in marathi asp