Swapna Shastra : स्वप्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपण स्वप्नांच्या जगात जातो. झोपेतून उठल्यानंतर काही लोकांना स्वप्नं आठवतात; तर काहींना आठवत नाही. शास्त्रानुसार स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी या भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात.
काही स्वप्नं माणसाला त्याच्या विवाहित आयुष्याविषयी काही संकेत देतात; तर काही स्वप्नं माणसाला लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत देतात. ही स्वप्नं कोणती चला ते जाणून घेऊ या.
१. स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात हळद किंवा मेंदी दिसली, तर समजायचं की ते लवकरच लग्नबंधनात अडकणार. म्हणजेच त्या व्यक्तीला चांगला जोडीदार मिळू शकतो.
२. जर एखादी मुलगी स्वप्नात स्वत:ची तयारी करताना दिसत असेल किंवा मेकअप करताना दिसत असेल, तर समजायचं की, लवकरच तिचं लग्न होऊ शकतं.
३. जर कुणाला स्वप्नात मोर दिसला असेल, तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला लग्नासाठी चांगल्या कुटुंबातून स्थळ येऊ शकतं.
हेही वाचा :Lucky People : ‘या’ तीन महिन्यांत जन्मलेले लोक सर्वांत जास्त असतात नशीबवान; तुम्ही यात आहात का?
४. स्वप्नशास्त्र सांगतं की, जर स्वप्नात तुम्ही स्वत:ला नाचताना बघितलं, तर समजायचं की, लवकरच तुमचा विवाह होऊ शकतो.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)