स्वप्नं हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती झोपेत काही ना काही स्वप्नं पाहत असते. काही स्वप्नं जागे झाल्यावर विस्मृतीत जातात; तर काही स्वप्नं मनात आणि मेंदूत कुतूहल निर्माण करतात. कधी कधी काही स्वप्नं अनेक महिने सतत आपल्या डोळ्यांसमोर येत राहतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, झोपेत येणाऱ्या स्वप्नांचा तुमच्या वास्तविक जीवनावर खूप प्रभाव पडतो. पण, स्वप्नांचा नक्की काय अर्थ असतो? स्वप्नशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचे वेगवेगळे अर्थ सांगितले आहेत. स्वप्नविज्ञान तज्ज्ञांच्या मते, झोपेत येणारी स्वप्नं आपल्या आयुष्यात येणारे चांगले, वाईट दिवस दर्शवीत असतात. पण, काही वेळा एखाद्या मुलीला स्वप्नात एक तरुण मुलगा वारंवार दिसतो. अनेकदा अशा स्वप्नांमुळे घाबरायला होते. पण, अशी स्वप्नं का पडतात याचा काय अर्थ असतो जाणून घेऊ …
स्वप्नात दिसतो तरुण मुलगा
जर एखाद्या मुलीला स्वप्नात वारंवार तरुण मुलगा दिसत असेल, तर त्याचा अर्थ त्या मुलाबद्दल ती अधिक विचार करते. हे शुभ संकेत असल्याचे ज्योतिषशास्रात सांगितले जाते. याचा अर्थ असा काढला जातो की, भविष्यात तुमची त्या मुलाबरोबर घट्ट मैत्री होणार आहे.
स्वप्नात प्रियकर दिसतो का?
अनेक मुलींना स्वप्नात त्यांचा प्रियकर दिसतो. स्वप्नशास्त्र तज्ज्ञांच्या मते, हे स्वप्न खूप शुभ असते. त्याचा अर्थ सांगताना शास्त्राचे जाणकार सांगतात की, जेव्हा एखादी मुलगी तिच्या मनातील प्रेमाच्या अपार भावनांना दाबण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अशी स्वप्नं पडतात. मात्र, जोपर्यंत प्रेम शब्दांत व्यक्त होत नाही तोपर्यंत अशी स्वप्नं येत राहतात.
स्वप्नात एक उंच मुलगा दिसणे
ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या मुलीला स्वप्नात उंच मुलगा दिसत असेल, तर मुलीसाठी ते खूप शुभ स्वप्न असल्याचं सिद्ध होऊ शकतं. पुढील काळात तिला नोकरी आणि व्यवसायात मोठी उडी घेण्याची संधी मिळू शकेल.
अनेकदा दिसते मांडीवर खेळणारे मूल
अनेक वेळा मुलींना स्वप्नात एक लहान मूल मांडीवर खेळताना दिसते. अशा स्वप्नाचा अर्थ असा होतो की, मुलीच्या संपत्ती आणि व्यवसायात प्रचंड वाढ होण्याची शक्यता असते. मांडीवर खेळणारं लहान मूल हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं.
(टीप : हा लेख माहितीच्या उद्देशाने लिहिला गेला आहे. आमचा हा लेख कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाही.)