Personality As Per Your Zodiac Sign: वैदिक ज्योतिषशास्त्र केवळ भविष्याचे वेध घेण्यासाठीच नव्हे तर वर्तमानाशी संबंधित अनेक गोष्टींचा आढावा घेण्यासाठी सुद्धा अभ्यासले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. या ग्रहाचं प्रभावानुसार तसेच मूलांक, भाग्यांक यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असणार हे ठरत असते. याला कित्येकवेळा परिस्थिती अपवाद असू शकते. आज आपण अशा काही राशींच्या व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत ज्या अत्यंत गोड बोलणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. पण त्यांचे बर्फीसारखे गोड बोल हे खरंतर जिलेबीसारख्या गोल गोल हेतूशी संबंधित असतात हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. तुम्हीही कदाचित तुमच्या मित्र परिवारात, कुटुंबात, ऑफिस, शाळा, कॉलेजमध्ये अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेला असू शकता.

बर्फीसारखे गोड शब्द, जिलेबीसारख्या गोल हेतू म्हणजे ‘या’ राशीचे लोक

मकर रास (Capricorn Zodiac)

मकर राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत. ही लोकं ही कामात नेहमी पुढे राहू इच्छितात, चार चौघांमध्ये आपलं कौतुक झालं नाही तर त्यांना अजिबात आवडत नाही. हाच स्वभाव त्यांना आयुष्यात प्रचंड यश सुद्धा मिळवून देऊ शकतो. पण अनेकदा आपलं काम पूर्ण करण्यासाठी जेव्हा त्यांना इतरांची मदत लागते तेव्हा त्यांना संकोच वाटू लागतो. मग मदत घेताना समोरच्याच लक्ष सहज विचलित करण्यासाठी ही मंडळी गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करतात. प्रचंड अभ्यासू व निरीक्षणात तरबेज असल्याने यांच्या बोलण्यात इतका खरेपणा भासतो की समोरच्याला यांच्या मुख्य हेतूची शंकाही येत नाही. असं असूनही समोरच्याचं नुकसान होणार नाही इतकी मर्यादा ही मंडळी पाळतात. कुणाचे वाईट चिंतित नाहीत.

Shukra Gochar 2024
दिवाळीनंतर शुक्र करणार धनु राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब; धनलाभासह मिळू शकते नवी नोकरी
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
newly married girl loksatta article
इतिश्री : वैचारिक सीमोल्लंघन
environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण
Loksatta chaturang life encouraged think Cognitive Science
जिंकावे नि जगावेही: विचारांची सदाबहार फुलबाग
Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
Fasting On Navratri? These Tips Will Make Sure Your Nine Days Are A Breeze Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting
Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

मंगळ देवांच्या अधिपत्याखाली येणारी वृश्चिक रास साहस व वीरतेचे प्रतीक मानली जाते. पण कित्येक वेळा परिस्थितीचा अंदाज न आल्याने किंवा अतिउत्साहाने भारावून जाऊन यांच्या कामात अडथळा येतो. कित्येकदा तर ही मंडळी विचारही केला नसेल अशा पद्धतीने एखाद्या प्रकरणात गुंतत जातात. मग अशावेळी अहं जपण्यासाठी आणि आपण तोंडघशी पडल्याचे न दाखवण्यासाठी त्यांना इतरांची मदत घ्यावी लागते. अशावेळी अगदी शिताफीने गोड बोलून ते समोरच्यांकडून काम करून घेतात. या मंडळींना समोरच्याच्या कलांनी मुद्दा हाताळण्याचं कौशल्य प्राप्त असतं.

हे ही वाचा<< १३ ऑगस्टपर्यंत कोणत्या राशीच्या व्यक्ती कशा होतील श्रीमंत? अधिक श्रावण संपताना ‘या’ लोकांना धनलाभाचे योग

कन्या रास (Virgo Zodiac)

कन्या राशीचे लोक हे अत्यंत मृदुभाषी व लाजाळू म्हणून ओळखले जातात. काही वेळा त्यांचा स्वभाव त्यांचे काम वाढवू शकतो. मग अशावेळी त्यांना काम पूर्ण करताना समोरच्याची थेट मदत मागण्यापेक्षा गोड बोलून काम काढून घेण्याचा पर्याय अधिक सोपा वाटतो. कन्या राशीच्या लोक प्रेमळ असतात त्यांना अधिकार वाणीने बोलताना आपण समोरच्याला दुखावू अशी भीती असते त्यामुळे त्यांना समोरच्या व्यक्तीस आदेश द्यायचे असले तरी ते साखरेत घोळवून तुपात भिजवून शब्द उच्चारतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व सामान्य निरीक्षणावर आधारित आहे.)