Maghi Ganesh Jayanti 2022 : प्रत्येक महिन्यात येणारी चतुर्थी ही गणपतीला समर्पित असते. शास्त्रांनुसार माघ शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश जयंतीच्या रूपात साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला होता. म्हणूनच या दिवशी श्रद्धेने उपवास ठेवून बाप्पाची पूजा केल्याने आपले दुःख दूर होतात. याशिवाय या दिवशी गणपतीला दुर्वा आणि सुपारी अर्पण केल्याने तो प्रसन्न होतो आणि वरदानही देतो. यावेळी माघी गणेश जयंती ४ फेब्रुवारी, शुक्रवारी आहे. याचनिमित्ताने जाणून घेऊया घरात कोणत्या प्रकारची गणपतीची मूर्ती ठेवावी आणि त्याचे काय फायदे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरामध्ये कोणत्या प्रकारची गणेशमूर्ती ठेवावी?

देवघरात गणेशमूर्ती ठेवण्याचे काही खास नियम सांगितले गेले आहेत. देवघरात सम संख्येत म्हणजेच २, ४, ६ या संख्येत गणेश मूर्ती ठेवावी. तसेच ती बसलेल्या स्वरूपात असावी. देवघरात उभी असलेली गणेशमूर्ती ठेवणे चांगले मानले जात नाही.

Photos : माघी गणेशोत्सवाची लगबग, बाप्पाला सजवण्यात मूर्तीकार मग्न

वेगवेगळ्या इच्छांसाठी गणेशमूर्ती

श्वेतार्क गणपती – रुईच्या झाडाच्या मुळापासून बनवलेल्या श्वेतार्क गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्याने दृष्टीदोष, चेटूक वगैरेची भीती राहत नाही.

पारद गणपती – पारद दगडापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. गणेशाच्या या रूपाची पूजा केल्याने जीवन आनंदी होते.

चंदनाचा गणपती – चंदनाच्या गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.

चांदीचा गणपती – चांदीच्या गणेशमूर्तीची पूजा केल्याने जीवनात धन-संपत्ती कमी होत नाही. यासोबतच कर्जाचा प्रश्नही सुटेल.

मूंगा गणपती – सिंदूर प्रवाळापासून बनवलेल्या गणपतीची पूजा केल्याने शत्रूंची भीती नसते. यासोबतच तुम्हाला आनंदी जीवनाचा आशीर्वाद मिळतो.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take home this idol of ganpati there will never be a financial crisis pvp
Show comments