– जयंती अलूरकर

Tarot Card Predictions For 2023: कोविड आणि त्यानंतरची दोन वर्षे सर्वांनाच खूप काही शिकवून गेली. त्यामध्ये पैसा, नातेसंबंध ह्या सर्व गोष्टींची किंमत करायला आपण शिकलो. त्यातून बाहेर पडत आपण नव्या उमेदीने नव्या वर्षांत कामाला लागलो आहोत. ‘येणाऱ्या वर्षात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे?’ अशा उत्सुकतेने टॅरोच्या (Tarot card) भविष्याची वाट पाहताय ना? चला तर मग पाहूया काय म्हणतंय नवीन वर्ष

मेष

हे वर्ष अत्यंत आनंदी व भरभराटीचे आहे. तुम्हाला जे पाहिजे आहे ते घडवून आणण्याची ताकत तुमच्यातच आहे, ती ओळखून नियोजनपूर्ण वाटचाल करण्याचा हा काळ आहे. हात घालाल तिथे यश मिळेल. त्याला अथक प्रयत्न व परिश्रमाची जोड मिळेल. आता पर्यंत केलेल्या कष्टाचं चीज होईल. स्वतःच्या ध्येयावर नजर राहू द्या. ज्ञान हीच तुमच्या यशाची किल्ली आहे, हे लक्षात ठेवा. भरपूर सारा प्रवास घडणार आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

वृषभ

कितीही अवघड परिस्थितीवर सहज मात करू शकाल. योग्य वेळी, योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास असू द्या. महत्त्वाची कामे इतरांवर सोपवण्याची चूक करू नका. आर्थिक आणि मानसिक ओढाताण संपणार आहे पण त्यासाठी थोडा धीर धरा. जमीन-जुमल्यात केलेली जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या कृतींची जबाबदारी स्वतः घेण्यास शिकणार आहात त्यामुळे खूप अडचणी, गैरसमज दूर होतील. या वर्षी यश मिळवताना थोडे जास्त कष्ट पडले तरी खचून न जात डोक्यावर बर्फ व तोंडात साखर हा मंत्र लक्षात असू द्या, हाच मंत्र या वर्षी यश देईल

मिथुन

अत्यंत खेळीमेळीचे वातावरण यावर्षी लाभणार आहे. घरी व कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य मिळाल्याने यशाचा मार्ग सुकर होईल. मिळालेल्या यशाचे श्रेय सर्वांना वाटून दिल्यास मन शांत राहील व पुढील वाटचाल सोपी होईल. विवाह योग दिसत आहेत. नवी नोकरी, व्यवसाय यात ओळखीतून फायदा मिळेल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. प्रेम व भावना ह्यामध्ये गल्लत करू नका.

कर्क

जे आपल्याला साध्य करायचे आहे ते ध्येय ठरवून घ्या. ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. यशा नंतर अपयश आणि अपयशा नंतर यश हे चक्र कायम फिरतच असते त्यामुळे मिळणाऱ्या यशाने हुरळून न जाता लक्ष्यावर असलेली तुमची नजर जराही ढळू देऊ नका. अपयशाने खचून जाऊ नका. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आयुष्याचा सुवर्णकाळ समोर आहे, सकारात्मक विचार करा. यश, पैसा आणि प्रसिद्धी उत्तम राहील. मन आनंदी आणि उत्साही राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. येणाऱ्या संधीचा पुरेपूर लाभ घ्या. हे वर्ष तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे असेल.

सिंह

तुमच्या अडचणी आता दूर होणार आहेत. मात्र व्यवहारात अतिसतर्क रहा, अन्यथा फसगत होण्याची शक्यता असेल. आयुष्यात पुढे जाणे ही काळाची गरज आहे हे समजून घ्या. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. वेळेप्रमाणे आपल्याला वागावे-बदलावे लागणार आहे. पैसा-पाणी उत्तम राहील. घरातले वातावरण तुमच्याच वागण्यावर अवलंबून आहे. मूड स्विंग्ज सांभाळा. शारीरिक आणि मानसिक ताण-तणाव कमी होणार आहेत पण तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, तब्येत सांभाळा.

कन्या

आयुष्यातले सोनेरी पान लिहिण्याची संधी तुम्हाला यावर्षी मिळेल. नवीन नोकरी, नवा व्यवसाय, शिक्षण यामध्ये स्वतःचा ठसा उमटवाल. भरपूर प्रवास कराल. नवीन नाते-संबंध जुळतील. आर्थिक लाभ, मोठ्या पगाराची नोकरी, बढती, यामुळे वातावरण उत्साही राहील. परदेशात कामासाठी प्रयत्न करा, यश मिळेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो, काळजी घ्या.

तूळ

आयुष्यात आलेल्या चांगल्या-वाईट प्रसंगांमुळे स्वभावात थोडासा तुटकपणा आलेला आहे. मिळून-मिसळून रहा अन्यथा एकटेपणा वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची कुवत ओळखूनच जबाबदाऱ्या द्या. नोकरी-व्यवसायात मोठे यश मिळणार आहे. अधिकारपद हातात येईल. सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. हेकेखोरपणा कमी करा. शक्ति पेक्षा युक्ति चांगली ही यशाची गुरूकिल्ली असेल, तिचा वापर करा.

वृश्चिक

‘हम करे सो कायदा’ हा स्वभाव आता बदला. आजूबाजूचे तुम्हाला काहीतरी सांगण्याचा समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, ते किमान ऐकून घ्या. झाला तर तुमचाच फायदा आहे. कामाच्या ठिकाणी अतिआत्मविश्वास धोक्याचा आहे. कोणताही निर्णय घेताना सतर्क रहा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आर्थिक परिस्थिती चांगली आहे. कुटुंबालाही तुमची गरज आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. खासकरून तुमच्या मुलांना, तुमच्या मदतीची गरज आहे त्यांच्याकडे लक्ष द्या.

धनु

हे वर्ष सुखा-समाधानाचे आणि भरभराटीचे जाणार आहे. नव्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हसत-हसत उचलाल. हात घालाल त्या गोष्टीत यश मिळेल. घर व काम दोन्हीकडे संतुलन राखण्याची गरज आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. भविष्याच्या नियोजनाच्या दृष्टीने गुंतवणूक करण्यासाठी हा योग्य काळ आहे. लग्नाचे योग आहेत. जुने मित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनंतर भेटतील.

मकर

सर्व काही उत्तम असूनही एक अनामिक भीती सतत जाणवत राहील. कुठेतरी आत्मविश्वास डगमगतो आहे. कामावरचे लक्ष विचलित होत आहे. निर्णय जरा जपून घ्या. मनावर संयम ठेवा. शांत राहून येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जा. राग, चिडचिड टाळा. घरामध्ये वाढणारा ताण कमी करायचा प्रयत्न करा. आर्थिक परिस्थिती स्थिर राहणार आहे, त्याबाबत काळजी नसावी.

कुंभ

खूप प्रलंबित कोर्टाचे निकाल तुमच्या बाजूने लागतील. ज्याच्या प्रतिक्षेत आहात, त्या संदर्भातील पत्र-संदेश मिळतील. नोकरी-व्यवसायात सुसंधी मिळेल. हातात भरपूर पैसा खेळत राहील. तुमच्या जवळच्या लोकांची खरी किंमत तुम्हाला समजेल. त्यांचा योग्य तो मान ठेवणे ही यशाची गुरुकिल्ली आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्याकडून चुकूनही कुणाचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्या. अन्यथा तो अपमान तुमच्या नुकसानीस कारणीभूत ठरेल. शब्द जपून वापरा. येणार काळ तुमच्या साठी उत्तम गुंतवणुकीचा काळ आहे. दीर्घकालीन गुंतवणूक नक्की करा.

मीन

येणाऱ्या वर्षात नवे व मोठे बदल आयुष्यात होणार आहेत, जे तुमच्याकरता अत्यंत यशदायी व आर्थिक लाभ देणारे आहेत. नोकरीत बढती मिळेल त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल. मुलांची चांगली प्रगती होईल. नवे घर, गाडी घेण्यास उत्तम काळ. तुम्ही तुमच्या इच्छांच्या पूर्ततेच्या दिशेने जात आहात. कामावर लक्ष केंद्रित केल्यास लवकरच उच्चपदी जाल. मात्र तब्येत सांभाळा.

Story img Loader