Taurus Annual Horoscope 2025 : वृषभ ही शुक्राची रास आहे. कलात्मकता, रसिकता आणि नाविन्याची ओढ हे शुक्राचे गुणधर्म वृषभ राशीतही पुरेपूर दिसून येतात. आपले जीवन कसे समृद्ध होईल याकडे आपला कल असतो. निर्मितीक्षमता आणि सर्जनशीलता आपल्यामध्ये आढळतात. भरपूर काम करणे जसा आपला स्थायी भाव आहे तसाच आपल्याला आराम सुद्धा मनापासून आवडतो. जे चांगले, उत्तम ते आपल्याला हवे असा आपला ध्यास असतो. दीर्घोद्योगी, आशावादी आणि व्यवहारकुशल अशा या वृषभ राशीला, २०२५ हे नववर्ष कसे असेल हे पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्षभरात होणाऱ्या महत्वाच्या ग्रहांचे राशीबदल वृषभ राशीच्या दृष्टीने असे आहेत. १८ मार्चला हर्षल व्ययस्थानातील मेष राशीतून आपल्या वृषभ राशीत प्रवेश करेल. २९ मार्चला शनी दशम स्थानातील कुंभ राशीतून लाभ स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल. १४ मे रोजी गुरू आपल्या वृषभ राशीतून द्वितीय स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल. याच महिन्याच्या अखेरीस राहू आणि केतू वक्र गतीने दशम स्थानातील कुंभ राशीत आणि चतुर्थ स्थानातील सिंह राशीत प्रवेश करतील.

१) जानेवारी (January 2025 Horoscope) :

नव्या वर्षाचे स्वागत नव्या उत्साहात कराल. नवे संकल्प करण्याच्या मागे न लागता हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण कराल. विद्यार्थी वर्गाची मेहनत त्यांच्या प्रगती पुस्तकावरून दिसून येईल. नव्या उमेदीने आगेकूच कराल. नोकरी व्यवसायात आपल्या चतुरपणाची चुणूक दाखवाल. सहकारी वर्गाला मदतीचा हात पुढे कराल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक समस्यांमधून मार्ग काढावा लागेल. अशा वेळी एकमेकांच्यात सुसंवाद ठेवणे खूप महत्वाचे असते हे ध्यानात असू द्या. नातेसंबंधांना महत्व द्याल. गुंतवणूकदारांसाठी मकर संक्रांत मोठी संधी घेऊन येत आहे. जागेच्या बाबतचे कागदपत्र तज्ञांकडून तपासून घ्यावेत. त्वचा कोरडी पडेल, तडे जातील.

२) फेब्रुवारी (February 2025 Horoscope) :

शुभ कार्य ठरल्याने खर्चाचे प्रमाण वाढेल. मित्रमंडळींचे सहकार्य कामी येईल. विद्यार्थी वर्ग अधिक केंद्रित होईल. मेहनतीचे महत्व पटेल आणि सातात्याची ओढ लागेल. मनापासून घेतलेले कष्ट परीक्षेत गुणांच्या रूपात स्पष्ट दिसून येतील. नोकरी व्यवसायात कष्टाचे चीज होईल. बढती मिळेल. प्रगतीपथावर वाटचाल कराल. विवाहोत्सुक मुलामुलींनी वधुवर संशोधन सुरू ठेवावे. ग्रहमान पूरक आहे. विवाहितांचे सूर जुळतील. नात्यात दृढता येईल. संतती प्राप्तीचे प्रयत्न डॉक्टरी उपायांनी फलद्रुप होतील. महाशिवरात्र भाग्यकारक ठरेल. आनंदाची बातमी समजेल. गुंतवणूकदारांनी घाई करू नये. आपला हलगर्जीपणा नडेल. थोडे सबुरीने घ्यावे. खांदे, दंड दुखावतील. सूज येईल.

३) मार्च (March 2025 Horoscope) :

बरेच बदल घडवणारा असा हा मार्च महिना असेल. जबाबदारीने आपले काम पूर्ण केल्याने त्याचा खूप चांगला मोबदला मिळेल. विद्यार्थी उत्तम मेहनत घेतील. अभ्यासाच्या विश्वात बुडून जातील. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक निर्णय घ्याल. वरिष्ठ वाहवा करतील. होळीमध्ये सगळी अरिष्ट नाश पावतील. १८ मार्चला हर्षल आपल्या वृषभ राशीत प्रवेश करेल. नवविचारांचे वारे वाहतील. २९ मार्चला शनी लाभ स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल. शनी हा न्यायकारक ग्रह असल्याने कष्टाचे योग्य फळ मिळेल. महिन्याच्या अखेरीस २९ मार्चला येणारा गुढीपाडवा जणू आपल्या यशाची गुढी उंचावेल. हा महिना आरोग्यदायी असेल. गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. मैत्रीचे नाते अधिक दृढ होईल. गुंतवणूक करताना अनेक लहानमोठ्या गोष्टी काटेकोरपणे तापसाव्यात.

४) एप्रिल (April 2025 Horoscope) :

आर्थिक वर्षाची सुरुवात चांगली होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. तणतणाव कमी होईल. मनोबल वाढल्याने विद्यार्थी वर्ग प्रगती करेल. आवडत्या क्षेत्रातील लहान मोठे कोर्स कराल. नोकरी व्यवसायात अधिकार आणि आत्मविश्वास यांच्या बळावर उच्च पद भूषवाल. विवाहोत्सुकांचे लग्न ठरेल किंवा होईल. जोडीदाराच्या साहाय्याने उत्पन्नात भर पडेल. एकमेकांच्या विचारांचा आदर कराल. नवे कार्यक्षेत्र आपणास खुणावेल. गुंतवणूक दारांनी भूलथापांच्या आहारी जाऊ नये. विवेक बुद्धी जागरूक ठेवा. संधीसाधू लोकांपासून सावधान ! घर, जमीन यासंबंधीची कामे वेग घेतील. वैयक्तिक लक्ष घालावे. अक्षय्य तृतीया आनंदाचे घडे भरभरून देईल. आरोग्यदायी महिना.

५) मे(May 2025 Horoscope) :

कोणत्याही कामाची आधीपासून केलेली तयारी वेळेवर उपयोगी पडते याचा अनुभव या महिन्यात घ्याल. महत्त्वाची कामे मार्गस्थ होतील. मेहनत आणि सातत्य यांची सांगड घातल्याने विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी खूप फायदा होईल. परदेशातील शिक्षणासंबंधीत परीक्षा यशस्वीरीत्या पार पडतील. १४ मे रोजी गुरू द्वितीय स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करत आहे. आपल्यासाठी गुरूचा हा राशी बदल हितावहच असेल. नोकरी व्यवसायात नवे करार कराल. २९ मे रोजी राहू व केतू वक्र गतीने दशमातील कुंभ आणि चतुर्थातील सिंह राशीत प्रवेश करतील. बुद्ध पौर्णिमेला कामाच्या ठिकाणच्या राजकारणात आपला ठसा उमटवाल. विवाह योग सुरू आहेत. घरच्या जबाबदाऱ्या वाढतील. खांदे आणि मणका यांची विशेष काळजी घ्यावी.

६) जून (June 2025 Horoscope) :

ऋतुबदलाचा परिणाम तब्येतीवर दिसेल. स्वतःची काळजी घेणे आवश्यक ठरेल. कामाची आखणी करताना जोडीदाराच्या व्यस्ततेचाही विचार करावा लागेल. वैचारिक देवाणघेवाण लाभकारक ठरेल. विद्यार्थ्यांना मनाजोगते शिक्षण घेण्याची संधी मिळेल. या संधीचे सोने करणे आता आपल्या हाती आहे. नोकरी व्यवसायात कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. घर, प्रॉपर्टी बाबतचे निर्णय तडकाफडकी घेऊ नका. वटपौर्णिमेच्या सुमारास नव्या करारावर सही कराल. गुरुबल चांगले आहे. गुंतवणूकदारांनी मोठी जोखीम न घेता सुरक्षिततेकडे अधिक भर द्यावा. हव्यास टाळावा. जुन्या ओळखीच्या व्यक्तींना भेटाल. संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. मिश्र हवामानामुळे डोकेदुखीचा त्रास बळावेल.

७) जुलै (July 2025 Horoscope) :

ग्रहमानाची चांगली साथ असल्याने जीवनाला गती येईल. रेंगाळलेली कामे पुढे सरकतील. तसेच अधिक लक्ष घातल्यास पूर्ण होतील. आषाढी एकादशीला मनपसंत बातमी समजेल. विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेला गुरुजनांच्या मार्गदर्शनाचा विशेष लाभ मिळेल. नोकरी व्यवसायात आलेले कटू अनुभव मोठी शिकवण देणारे ठरतील. ज्येष्ठ तज्ञ मंडळींचे साहाय्य मिळेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत. जोडीदाराच्या कामात यश येईल. एकमेकांवरचा विश्वास आणि आदर दृढ होईल. आधी केलेली गुंतवणूक लाभकारक ठरेल. विचारांमध्ये एकवाक्यता ठेवल्यास इतरांवर आपला खूप जबरदस्त प्रभाव पडेल. हितशत्रूंना कोणतीही संधी देऊ नका. कामाचा व्याप वाढला तरी ताण घेऊ नका.

८) ऑगस्ट (August 2025 Horoscope) :

सणावारांनी सजलेल्या या महिन्यात मित्रमंडळी आणि आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होतील. नारळी पौर्णिमा फलदायी ठरेल. नवी नाती जुळतील. जुन्या कटू प्रसंगांच्या आठवणींनी मन अशांत होईल. श्रीकृष्ण जन्माष्टमी चित्त स्थिर करण्यास मदत करेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासवरील लक्ष ढळू देऊ नका. नोकरी व्यवसायात विशेष प्रगती कराल. गुरुबल चांगले असल्याने मेहनत फळास येईल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरण्यास योग्य असे ग्रहमान आहे. प्रयत्नशील रहा. पतीपत्नी नातेसंबंधाच्या रेशीमगाठी दृढ होतील. गुंतवणूकदारांसाठी श्री गणेशाचे आगमन मनातील इच्छा पूर्ण करणारे असेल. उत्साहाच्या भरात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

हेही वाचा –१ जानेवारीला चमकू शकते ‘या’ राशींचे नशीब! मंगळ अ्न चंद्र निर्माण करणार शक्तीशाली धन योग; जबरदस्त यश मिळण्याचे योग

९) सप्टेंबर (September 2025 Horoscope) :

हिंमत आणि उत्साह वाढवणारा हा महिना आहे. लाभतील शनी आपल्या कष्टाला योग्य न्याय देईल. उशीर झाला तरी सत्याचा विजय होईल. विद्यार्थी वर्गाला परदेशी शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. रेंगाळलेल्या कामांमागे तगादा लावल्याने ते पूर्णत्वास जाईल. नोकरी व्यवसायातही अशाच अनुभवाची भर पडेल. पितृपक्षात पूर्वजांच्या पुण्याईने स्मरण अतिशय लाभकारक ठरेल. गरजूंना मदत कराल. विवाहोत्सुकांनी जोडीदाराच्या संशोधनाचे प्रयत्न सुरु ठेवावेत. नवरात्रीच्या दरम्यान विवाहितांना एकमेकांची उत्तम साथ मिळेल. कामाचा हुरूप वाढेल. गुंतवणूकदारांनी थोडी विश्रांती घ्यावी. उत्सर्जन संस्थेचे विकार त्रासदायक ठरतील.

१०) ऑक्टोबर ( October 2025 Horoscope) :

महिन्याची सुरुवातच दसऱ्याने होत आहे. विद्या, संपत्ती, समृद्धी आणि धैर्य देणारा दसरा अतिशय शुभ फळ देईल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील एकाग्रतेमुळे चांगला फायदा होईल. आत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसायातील खाचखळगे आधीच ओळखाल. त्यानुसारच पुढचा डाव मांडाल. १८ ऑक्टोबरला गुरू कर्क राशीत प्रवेश करेल. आपल्यासाठी हा राशी बदल हितकारक ठरेल. विवाहोत्सुकांचे विवाह दिवाळीच्यादरम्यान ठरतील. दिवाळी आनंदाची आणि उत्साहाची असेल. जोडीदारासह लहानमोठे वाद झाल्यास वेळेवरच मिटवा. गैरसमजाला थारा देऊ नका. गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी मिळेल. तरी देखील डोळे उघडे ठेवूनच व्यवहार करावेत. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलेत तरच आरोग्य चांगले राहील.

११) नोव्हेंबर (November 2025 Horoscope) :

आपल्या माणसांसाठी घेतलेले कष्ट कामी येतील. इतरांच्या दृष्टीने कदाचित तो वेळेचा अपव्यय असला तरी आपल्या मनाला समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. अचूकता आणि नेमकेपणा अंगी बाणवाल. ११ नोव्हेंबरपासून गुरू वक्री होईल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अतिउत्साहात जास्तीच्या जबाबदार्‍या स्वीकारू नका. तसे केल्यास पुढे ते डोईजड होईल. विवाहोत्सुकांचे योग चांगले
आहेत. देवदिवाळीच्या आसपास जोडीदारासह कौटुंबिक समारंभात मानाचे स्थान मिळेल. प्रॉपर्टीची, स्थावर इस्टेटीची कागदपत्रे बारकाईने तपासावी लागतील. मूत्रविकार, चक्कर येणे, उलट्या होणे असे त्रास संभवतात. वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावे लागतील. इतरांची शुश्रूषा करताना स्वतःची देखील काळजी घेणे किती आवश्यक आहे याची जाणीव होईल.

हेही वाचा – Aries Yearly Horoscope 2025 : जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत मेष राशीसाठी नवीन वर्ष कसे असणार ? आर्थिक लाभ ते विवाह योग; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

१२) डिसेंबर (December 2025 Horoscope) :

५ डिसेंबराला गुरू वक्र गतीने पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करेल. आर्थिकदृष्ट्या लाभकारक ग्रहमान असल्याने कामाचा मोबदला उत्तम मिळेल. श्री लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. दत्त जयंतीनिमित्त पुण्य कार्य आणि दानधर्म कराल. विद्यार्थी वर्गाची मेहनत फळास येईल. सातत्य टिकवून ठेवणे आता आपल्या हाती आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळी आपल्या सूचनांचे कौतुक करतील. विवाहोत्सुकांना संशोधनाचा लाभ होईल. मनपसंत जोडीदार मिळेल. विवाहित दाम्पत्यांचे संतती प्राप्तीचे प्रयत्न सफल होतील. वाहन, घर आणि जमीनजुमला याबाबतचे निर्णय काही अपरिहार्य कारणांनी लांबणीवर पडतील. स्नायू खेचला जाणे वा आखडणे असे त्रास संभवतात. वेळेवर औषधोपचार घेतल्याने पुढचा धोका टळेल. अशा प्रकारे आपल्या वृषभ राशीला २०२५ हे वर्ष एकंदरीत लाभकारक ठरेल. धरसोड वृत्ती बाजूला ठेवलीत आणि सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केलात तर त्या गोष्टी प्राप्त करू शकाल. प्रवास योग चांगले आहेत. देशविदेशात भ्रमण कराल. बऱ्याच नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. जीवनमान उंचावेल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. घर, जमिनीची कामे मार्गी लागतील. हे वर्ष आपणास उत्कर्षकारक जाईल