Astrology Today: आज २४ जानेवारी २०२५ (शुक्रवार) रोजी पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची दशमी तिथी असून ही तिथी शुक्रवारी संध्याकाळ ७ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील. आजचा संपूर्ण दिवस अनुराधा नक्षत्र जागृत असून ते शनिवार सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र सुरू होईल. आजचा राहूकाळ सकाळी १०: ३० ते दुपारी १२ पर्यंत असेल. शास्त्रात शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा-आराधना करण्याचे महत्व आहे. देवी लक्ष्मी पैसा, धन-संपत्ती, भौतिक सुख प्रदान करते. त्यामुळे शुक्रवारचा दिवस १२ राशींपैकी कोणत्या राशींसाठी अधिक फायदेशीर असेल हे आपण जाणून घेऊ
या तीन राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
वृषभ
आजच्या दिवशी वृषभ राशीच्या कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त कराल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.
मिथुन
आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींनाही खूप आनंदात जाईल. घरात वेगवेगळी कामे निघतील, परंतु सर्व गोष्टी आनंदाने कराल. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींनाही आजचा दिवस खूप सकारात्मक जाईल. आज मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक समस्या दूर होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. दिवसभर आनंदी आणि सकारात्मक राहाल. परंतु भावनेच्या भरात चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)