सोनल चितळे

Taurus Yearly Horoscope 2024 Predictions in Marathi: वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा कलेचा , सौंदर्याचा कारक ग्रह आहे. त्याच प्रमाणे वृषभ राशीच्या व्यक्तींनाही कलेची जाण असते. त्यांच्या वागण्या- बोलण्यात सहजता आणि आपलेपणा असतो. या व्यक्ती समूहात सर्वांना हव्याहव्याशा असतात. त्यांच्या असण्याने घरात देखील जिवंतपणा आणि चैतन्य असते. परिस्थितीची चाचपणी करून त्यांना आपले काम योग्यप्रकारे साधता येते. वृषभ राशीच्या व्यक्तींना नाविन्याची आस असते. सतत काही ना काही करण्यात त्या मग्न असतात. कामाच्या वेळी भरपूर काम करणारी वृषभ रास आरामाच्या वेळी भरपूर आरामही करते. आपले जीवन सुखी आणि संपन्न करण्याकडे या व्यक्तींचा कल असतो. या व्यक्ती खऱ्या अर्थाने जीवनाचा उपभोग घेतात. वेळप्रसंगी कष्ट सोसायची देखील त्यांची तयारी असते. अशा या वृषभ राशीच्या मंडळींना 2024 हे नवे वर्ष कसे असेल याचा आढावा घेऊया.

स्वतःला सिद्ध करावे लागेल

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

यंदा संपूर्ण वर्षभर राहू लाभ स्थानातील मीन राशीतून भ्रमण करेल. तर केतू पूर्ण वर्षभर पंचम स्थानातील कन्या राशीतून भ्रमण करेल. या ग्रहयोगांमुळे आपणास विनासायास काही मिळणार नाही. स्वतःला सिद्ध करावे लागेल. शैक्षणिक प्रगतीबाबतीत अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. पूर्ण वर्ष नेपच्यून मीन राशीत असेल आणि प्लुटो मकर राशीतून भ्रमण करेल. करियर आणि भावनांचा समतोल यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे असे सूचित करणारे हे ग्रहयोग आहेत. दशमातील शनी वर्षभर कुंभ राशीतच असेल. करियर मधील सातत्य राखण्यास याचा खूप मोठा सहभाग असेल.

एप्रिल अखेरपर्यंत गुरू मेष राशीत असल्याने आपल्याला गुरुबल पूरक नाही. पण १ मे रोजी गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल आणि आपणास चांगले गुरुबल प्राप्त होईल. गेल्या वर्षभरात रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी गुरुबलाचा खूप उपयोग होईल. शिक्षण, नोकरी यास गती मिळेल. संततीप्राप्तीचा योग आहे. मे अखेरपर्यंत व्यय स्थानात असलेला हर्षल १ जूनला वृषभ राशीत प्रवेश करेल. घाईघाईत निर्णय घेण्यास हा हर्षल कारणीभूत ठरेल. तेव्हा अशा वेळी नेहमी सावध राहा. दोनदा, तीनदा विचार करून मगच अंतिम निर्णयाप्रत पोहोचावे. अशा या महत्त्वाच्या ग्रह बदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार आणि अभ्यास करता एकंदरीत वृषभ राशीचे वार्षिक ग्रहफल असे असेल.

वृषभ वार्षिक राशिभविष्य (Taurus Yearly Horoscope 2024)

जानेवारी (January Horoscope)

रवी, मंगळ आणि शनी या ग्रहांच्या पाठबळामुळे नव्या संकल्पना अमलात आणण्यास चांगली संधी उपलब्धहोईल. गुरुबल कमजोर असल्याने अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. सहज साध्य होणाऱ्या गोष्टी देखील विनाकारण रेंगाळतील, हीच खरी कसोटी आहे. धीराने घ्यावे. कष्ट आणि मेहनत कमी पडू देऊ नका. विद्यार्थी वर्गाला कंबर कसून ठामपणे उभे राहावे लागणार आहे. याची शारीरिक आणि मानसिक तयारी ठेवा. आज निभावून नेलेत तर उद्या आपलाच उत्कर्ष होणार आहे. नोकरी व्यवसायात मेहनतीचे चीज होण्यासाठी अतिशय लक्षपूर्वक परीक्षण, निरीक्षण करण्याची गरज आहे. विवाहित दाम्पत्याने गैरसमज टाळावेत. कोरड्या त्वचेमुळेअंगाला खाज येईल. वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.

फेब्रुवारी (February Horoscope)

भाग्य स्थानातील उच्चीचा मंगळ आपल्या कष्टाचे चीज करेल. शुक्र, राहूच्या सहकार्याने व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. भावनेच्या भरात विचार भरकटू नयेत याची खबरदारी घ्याल. कोर्टाचे कामकाज पुढे सरकेल. विद्यार्थ्यांना बुधाचे साहाय्य कमी पडेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नोकरी व्यवसायात विरोधकांना सामोरे जावे लागेल. आपले मुद्दे ठामपणे मांडाल, निर्धार सोडू नका. विवाहोत्सुक मुलामुलींनी थोडे सबुरीने घ्यावे. गुरुबल नसल्याने योग जुळून येण्यास विलंब लागेल. गुंतवणूकीतून लाभ होईल. घर, जमीन यासंबंधीची कामे हळूहळू मार्गी लागतील. मूत्रविकार, मूत्रपिंडविकार बळावतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा. सर्वसमावेशक विचारांती महत्त्वाचे निर्णय घ्यावेत.

मार्च (March Horoscope)

१९ मार्च रोजी शनी उदय झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी सावरण्यास मदत होईल. मीन राशीतील नीच बुध आणि त्याच्या सोबत असलेला राहू यामुळे मित्र मदतीची अपेक्षा करतील. कोर्टकचेरीतील कामात चातुर्याने डावपेच खेळावे लागतील. काही गोष्टी मनाविरुद्ध असल्या तरी त्या स्वीकाराव्या लागणार आहेत. विद्यार्थी वर्गाने आता मनोनिग्रह करणे आवश्यक आहे. आसपास अनेक प्रलोभने आहेतच. त्यापासून स्वतःला दूर ठेवावे. नोकरी व्यवसायात आपली खरी कसोटी आहे. जवळच्या व्यक्तीवर देखील अंधविश्वास ठेवू नका. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. त्यामुळे हक्काचा आधार मिळेल. खचून जाऊ नका. हाडे, स्नायू आणि स्नायूबंध यांचे आरोग्य जपावे.

एप्रिल (April Horoscope)

वेळेनुसार योग्य निर्णय घेत पुढे गेलात तरच या स्पर्धेच्या आणि धावत्या युगात आपला निभाव लागेल. लाभ स्थानातील उच्चीचा शुक्र बऱ्याच बाबतीत आपणास सावरून घेईल. वक्री बुधाच्या परिणामामुळे नातेसंबंधात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. २५ एप्रिलला बुध मार्गी होईल आणि परिस्थिती सुधारेल. विद्यार्थी वर्गाने शिस्त आणि वेळापत्रक पाळणे अत्यंत गरजेचे आहे. गुंतवणूकदारांनी परताव्याचा जास्त हव्यास धरू नये. चढउतारामुळे मोठा धनलाभ होणे सहज शक्य नसले तरी नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या साथीने महत्त्वाचा टप्पा पार कराल. हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांचा त्रास होईल.

हेही वाचा : ३० वर्षानंतर शनिदेव वक्री होताच ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ? जाणून घ्या, त्या तीन राशी कोणत्या?

मे (May Horoscope)

१ मेला गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल. चांगले गुरुबल प्राप्त होईल. हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. कष्टाचे चीज होईल. दशम स्थानातील शनीचा उत्तम पाठिंबा मिळेल. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला काल आहे. याचा पुढे नक्कीच फायदा होईल. विद्यार्थी वर्गाला गोंधळात पाडणारी स्थिती निर्माण होईल. अशावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक योग्य वाट दाखवतील, मेहनत आणि कष्टात कसलीही कसूर करू नका. नोकरी व्यवसायात आत्तापर्यंत धीर धरल्याने अनेक लाभ होतील. आर्थिक स्तर उंचावेल. विवाहोत्सुक मंडळींनी वधूवर संशोधन सुरू करावे.विवाहित दाम्पत्यांमधील वाद, तंटा मिटेल. समजूतदारपणा कामी येईल. गुंतवणूक करताना मर्यादित जोखीम पत्करण्यास हरकत नाही.

जून (June Horoscope)

१ जूनला मंगळ व्ययस्थानातील मेष राशीत प्रवेश करेल तर हर्षल मेषेतून वृषभ राशीत प्रवेश करेल. महिन्याचा उत्तरार्ध अधिक उत्कर्षकारक ठरेल. घाईगडबडीत कोणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका. अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे. शुक्र ,बुधाच्या सहकार्याने आर्थिकदृष्टय़ा लाभ हो ण्याच्या शक्यता आहेत. फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा सोबत व्यवहार ज्ञान असणे किती गरजेचे आहे याची प्रचिती येईल. विद्यार्थ्यांना नव्या संधी
खुणावतील. प्रगती कराल. नोकरी व्यवसायात महत्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घ्याल. विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळण्यास पूरक ग्रहमान आहे. विवाहीत दाम्पत्यांनी भविष्यासाठी पैसे साठवणे , गुंतवणे गरजेचे ठरेल.

जुलै (July Horoscope)

गुरू आणि शनी या बलवान ग्रहांच्या पाठबळावर मोठ्या कामगिरीत यश मिळवाल. जिद्दीने आगेकूच कराल. विद्यार्थी वर्गाला अडीअडचणीला तोंड द्यावे लागणार आहे. १२ जुलैला मंगळ वृषभेत हर्षलसह भ्रमण करेल.कोणताही विचार मांडताना शब्द सांभाळून वापरावेत. कदाचित आपले नवे विचार, नव्या पद्धती सर्वांना पचनी पडणार नाहीत. नकार स्वीकारायची देखील तयारी ठेवावी. डोक्यात राग घालून काही फायदा होणार नाही हे ध्यानात असू द्यावे. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घेणे इष्ट ठरेल. आपला अहंकार थोडा बाजूला ठेवावा लागेल. विवाहोत्सुक मुलामुलींच्या प्रयत्नांना यश मिळेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखकर असेल. आर्थिक गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा! प्रॉपर्टीच्या कामांना पुष्टी मिळेल.

ऑगस्ट (August Horoscope)

गुरू, रवी, शनी आणि शुक्र यांच्या सहयोगाने मर्यादित उपलब्धतेतही आपली छाप पाडाल. महत्वाची कामे हातावेगळी कराल. कामकाजात उत्तम प्रगती होईल. आपला निर्धार पक्का असू द्यावा. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने घेतलेली मेहनत निश्चितच फलदायी ठरेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरेल. त्याच्या भावी आयुष्यात देखील खूप उपयोग होईल. कृतज्ञता बाळगावी. उपवर मुलामुलींना सुयोग्य जोडीदार मिळण्यास गुरुचे साहाय्य मिळेल. विवाहितांचे संतान प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. मित्रांची मदत कराल. नातेवाईकांसाठी वेळ खर्च कराल. कामाच्या व्यापात पाठ, मणका आणि पोट यांचे आरोग्य दुर्लक्षित करू नका.

हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : मुस्लिम महिला अयोध्येतून काशीला घेऊन येतील रामज्योती, सजेल लख्ख दिव्यांची आरास

सप्टेंबर (September Horoscope) आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळणार आहे. कला, क्रीडा, छंद जोपासण्याची सुवर्णसंधी दवडू नका. निश्चित
केलेले ध्येय गाठण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहा. चांगल्या ग्रहयोगांमुळे आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. विद्यार्थी वर्गाने देखील ध्यास घेणे गरजेचे आहे. मेहनतीला पर्याय नाही . त्यामुळे आतापासूनच वेळापत्रकानुसार आपला दिनक्रम आखावा. नोकरी व्यवसायात मेहनतीसह शिस्तीचे पालन केल्यास अनेक कामे हातासरशी पूर्ण कराल. वेळेचे नियोजन खूप उपयोगी ठरेल. विवाहोत्सुक मंडळींकडून आनंदवार्ता समजतील. विवाहितांना वैद्यकीय सल्ल्याने संतानप्राप्तीचा मार्ग सुकर होईल. मालमत्तेच्याबाबत अधिक खबरदारी बाळगावी लागेल. स्त्रीरोगबळावतील तसेच मूत्रपिंडाचे आरोग्य सांभाळावे लागेल.

ऑक्टोबर (October Horoscope)

उत्साहाचे वातावरण राहील. नातेवाईक, मित्र मंडळींच्या भेटीगाठींमुळे जीवनात नवा जोश निर्माण होईल. कामातील सातत्य आणि लक्ष कमी होऊ देऊ नका. नोकरी व्यवसायात शनी, गुरू आणि राहूच्या साथीने यशाची शिखरे गाठाल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासापासून विचलित होऊन चालणार नाही. नव्या संधी उपलब्ध होतील. त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा. उपवर मुलामुलींचे विवाह जुळण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी ठरतील. विवाहितांना संतान प्राप्तीसाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य मार्गदर्शन मिळेल. गुंतवणूकदारांनी सतर्क राहावे. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आपले नुकसान होण्यापासून आपला बचाव करू शकतो. रक्ताभिसरणासंबंधित त्रास असल्यास तो बळावण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर (November Horoscope)

रवीचे बल कमी असल्याने घर, प्रॉपर्टी यासंदर्भातील कामे लांबणीवर पडतील अथवा रखडतील. कागदपत्रे नीट तपासून पहावीत. अन्यथा फसगत होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाने सहामाहीतील यशाने गाफील राहू नये. सातत्य टिकवलेत तरच मुख्य परीक्षा सर करू शकाल. नोकरी व्यवसायात स्थैर्य येईल. चिंता मिटतील. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ द्याल. आर्थिक दृष्टीने सक्षम व्हाल. प्रगतिकारक वाटचाल कराल. विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह ठरतील. योग चांगले आहेत. विवाहित दाम्पत्यांनी आपल्यातील समज, गैरसमज मोकळेपणाने बोलून दूर करावेत. नात्यात आढी येऊ देऊ नका. ताण तणाव कमी झाल्यास आरोग्याच्या तक्रारी देखील दूर होतील.

डिसेंबर (December Horoscope)

वर्षातील शेवटचा महिना संमिश्र फळ देणारा असेल. गुरू आणि शनीच्या पाठबळाने अनेक गोष्टी मनाजोगत्या होतील. परंतु काही महत्त्वाचे निर्णय वेळेवर न घेतल्याने नुकसान सहन करावे लागेल. विद्यार्थी वर्गाला अजिबात ढिलाई चालणार नाही. शिस्त अंगात भिनवलीत तरच निभाव लागेल हे ध्यानात ठेवावे. नोकरी व्यवसायातील यश विशेष उल्लेखनीय असेल. वरिष्ठांकडून सन्मान होईल. कष्टाचे चीज झाल्याचा आनंद होईल. आत्मविश्वास वाढेल. आयुष्याचा आनंद उपभोगता येईल. विवाह योग जुळून येतील. नातेवाईकांच्या समवेत वेळ आनंदात जाईल. रक्तातील घटकांचे प्रमाण वरखाली होईल. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

एकंदरीत २०२४ या वर्षात मेपासून गुरुबल प्राप्त होत असल्याने अनेक कामे पूर्ण होतील. विवाह जुळणे, संतती होणे किंवा त्यासाठीच्या प्रयत्नांना यश मिळणे , नोकरीमध्ये प्रगती होणे , आर्थिकदृष्ट्या लाभ होणे अशा शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. सातत्य , स्वयंशिस्त आणि ध्येय निश्चित केल्यास या वर्षात नक्कीच यशस्वी व्हाल.

Story img Loader