-सोनल चितळे

Taurus Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्राला सौंदर्याची जाण असते. तसेच वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये देखील सौंदर्यदृष्टी आणि वागण्या बोलण्यात सुबकता असते. या व्यक्ती उद्योगप्रिय असतात. गोड बोलणे, समजावून सांगणे हे त्यांना सहज जमते. परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन पुढे जाणे आणि आपला कार्यभाग साधणे त्यांना लीलया शक्य होते. बरेचदा त्यांना नवनवीन आणि चांगल्याचुंगल्या गोष्टींची आस असते. सकारात्मक आणि आशावादी असलेल्या वृषभ राशीच्या व्यक्ती कामाच्या वेळी भरपूर काम करतात आणि आरामाच्या वेळी त्यांना आरामही तितकाच प्रिय असतो. आपले जीवन सुखी व संपन्न करण्याकडे त्यांचा कल असतो. अशा या वृषभ राशीच्या मंडळींना २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल आपल्या व्यय स्थानातील मेष राशीतच स्थित असेल. २८ नोव्हेंबरपर्यंत हर्षलसह राहूदेखील मेष राशीत असेल. या कालावधीत अतिरीक्त आणि अनाठाई खर्चावर नियंत्रण ठेवावे. लहानसहान दुखणी दुर्लक्षित न करता त्यावर औषधोपचार घ्यावेत. २१ एप्रिलपर्यंत* गुरू आपल्या लाभ स्थानातील मीन राशीत असेल. या कालावधीत आपल्याला गुरुबल चांगले आहे. महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन वेळीच ती मार्गी लावावीत. नव्या संकल्पना अमलात आणाव्यात. २१ एप्रिलला गुरू आपल्या व्यय स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. तेव्हापासून आपले गुरुबल कमजोर होईल. कामात अडचणी येतील. साध्या, सरळ गोष्टींसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. अतिरिक्त ऊर्जा, पैसे खर्च होतील. परंतु आत्मविश्वास ढळू देऊ नका. तसेच प्रयत्नांत कसुर नको. १७ जानेवारीला शनी आपल्या दशम स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. जिद्द आणि चिकाटीने कर्तृत्व आणि कर्तव्य पार पाडाल, प्रयत्नशील राहाल. सातत्य टिकवून ठेवणे आपल्या हाती आहे. अशा या महत्वाच्या ग्रहबदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता एकंदरीत वृषभ राशीचे वार्षिक ग्रहफल असे आहे….

जानेवारी :


भाग्य स्थानातील रवी शुक्र आपल्या कामातील चढ उताराचा समतोल राखतील. दशम स्थानातील शनीची आपल्याला सकारात्मक साथ मिळेल. आळस झटकून कामाला लागा. विद्यार्थी वर्गाचा ताण वाढेल. आता वेळापत्रकानुसार वागण्याशिवाय पर्याय नाही. लाभ स्थानातील गुरू पाठीशी आहे. विवाहोत्सुकांना पूरक योग आहेत. प्रवास सुखकर होईल. अनपेक्षित खर्च वाढतील. जोडीदाराचा सल्ला मान्य कराल. गुंतवणुकीची घाई करू नका. सबुरीने घ्यावे. ओटीपोटाची काळजी घ्यावी.

फेब्रुवारी :

आपल्या राशीतील मंगळ आणि व्यय स्थानातील राहू, हर्षल आपणास विचार न करता निर्णय घेण्यास भाग पडतील. तसे झाल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. लाभतील गुरु शुक्राच्या मदतीने अविचाराने निर्णय घेणे टाळता येईल. मित्रांची चांगली साथ मिळेल. एकमेकांशी संवाद साधून कौटुंबिक वाद मिटवता येतील. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे सापडतील. वरिष्ठांना सद्य स्थितीची योग्य कल्पना द्याल. पैशाचे व्यवहार जपून करावेत. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंता वाटेल.

मार्च :

आपला राशी स्वामी शुक्र राहू आणि हर्षलसह भ्रमण करणार आहे. संगतीच्या दोषानुसार चुकीचा मार्ग स्वीकारावा असे प्रलोभन पडेल. परंतु विवेकबुद्धी जागरूक ठेवावी. वागण्या बोलण्यात कठोर शब्द टाळावेत. जोडीदारासह जुळवून घ्यावे. विद्यार्थीवर्गाने मन लावून केलेल्या अभ्यासाचे चीज होईल. गुरुची साथ चांगली मिळत आहे. परेदशासंबंधीत कामे मार्गी लागतील. भावंडांची मदत मिळेल. नोकरी व्यवसायात कनिष्ठ वर्गाची महत्त्वाची कामगिरी पूर्णत्वास जाईल. यशाकडे वाटचाल कराल.

एप्रिल :

व्यय स्थानातील उच्चीचा रवी राहूसह असल्याने गरज नसताना धाडसी निर्णय घेऊ पाहाल. मोठी जोखीम पत्करू नका. महिन्याच्या मध्यापर्यंत गुरुबल आहे. तोवर स्वतःला सावरणे शक्य होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र असेल. आपली मते घरात सर्वांना पटतीलच, असे गृहीत धरू नका. विद्यार्थी वर्गाने सामंजस्य दाखवावे. चिडचिड टाळा. ऊर्जेचा अपव्यय करू नका. उष्णतेचे विकार डोकं आणि पोटावर परिणाम करतील. शांत डोक्याने सर्व समावेशक विचार लाभकारी ठरेल.

मे :

व्यय स्थानातील मेष राशीत राहू हर्षलसह गुरू बुधाचे भ्रमण होत आहे. डोक्यात भन्नाट कल्पना थैमान घालतील. अशा विचारांना वेळीच आळा घालावा लागेल. आर्थिक नुकसान होऊ देऊ नका. प्रवास योग चांगले आहेत. द्वितीय स्थानातील मिथुन राशीतील शुक्र बुद्धीचातुर्य आणि गोड शब्दांनी प्रिय व्यक्तींचे मन जिंकेल. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे ठरेल. दशमातील शनी नोकरी व्यवसायातील खाचखळग्यांची पूर्वसूचना देईल. धुळीची ऍलर्जी होण्याची शक्यता आहे.

जून :

नव्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होईल. आपल्या राशीतील रवी आणि बुध प्रभावी सादरीकरण करण्यास मदत करतील. गुरुबल कमजोर असल्याने अपेक्षित यश मिळवण्यासाठी बेसावध न राहता कसून मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थी वर्गाने देखील शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीपासूनच जोरकस तयारी करावी. नोकरीमध्ये मेहनतीसह बुद्धीचातुर्याचा अवलंब करावा लागेल. राजकारणापासून दूर राहा. कामानिमित्त देशांतर्गत प्रवास कराल. धैर्य आणि संयम यांचा अवलंब करावा लागेल.

जुलै :

शनी साहाय्यकारी असल्याने मेहनत, सातत्य आणि चिकाटी ठेवलीत तर नक्कीच लाभदायक होईल. सत्याचा मार्ग सोडू नका. विद्यार्थीवर्गाने वेळेचे उत्तम नियोजन करणे अतिशय आवश्यक असेल. अन्यथा मेहनत वाया जाईल. गुरुबल कमजोर असल्याने सुरुवातीपासूनच ध्येय निश्चित करा. शनी बुधाचा शुभ योग कामकाजात नियोजनबद्धता देईल. त्यात सातत्य राखणे मात्र आपली जबाबदारी आहे. कुटुंबात , जोडीदारासह वाद निर्माण होतील. शब्दाने शब्द न वाढवणे हिताचे ठरेल. कफदोष बळावेल.

ऑगस्ट :

चतुर्थ स्थानातील रवी , मंगळ घरासंबंधीत कामकाज गतिमान करतील. स्थावर मालमत्तेची कागदपत्रे विशेष लक्ष देऊन तयार करून घ्यावीत. स्थावर खरेदी- विक्रीच्या कामासाठी ग्रहबल पुरेसे नाही. अडचणींना तोंड द्यावे लागेल. दशम स्थानातील शनीमुळे वरिष्ठ वर्ग आणि कनिष्ठ वर्ग यातील दुवा साधला जाईल. मेहनतीला पर्याय नाही. तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमात प्रगती कराल. मैत्रीचे नाते टिकवाल. उत्सर्जन संस्थेच्या तक्रारी वाढल्यास वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील. लहान मोठे प्रवास कराल.

सप्टेंबर :

तृतीय स्थानातील कर्क राशीतील शुक्र स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यास, छंद जोपासण्यास वेळ देईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुलांची त्यांच्या कामात , शिक्षणात प्रगती होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वाद घालू नका. काही महत्वाच्या संधी निसटून जातील. पण खचून जाऊ नका. धीराने घ्यावे. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मेहनतीचे आणि सातत्याचे फळ मिळेल. न टाळता येणारे खर्च पुढे उभे राहतील. जखम झाल्यास त्यात पू होईल. जखम चिखळण्याची शक्यता आहे. योग्य काळजी घ्यावी.

ऑक्टोबर :

चांगल्या लोकांच्या भेटीगाठी झाल्याने व्यवसायाची प्रगती होईल. स्थावर मालमत्तेसंबंधीत निर्णय घ्याल. नवी जागा खरेदी वा असलेल्या स्थावर मालमत्तेची विक्री करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. प्रत्यक्षात व्यवहार पूर्ण झाला नाही तरी या विषयीच्या कामाला चालना मिळेल. विवाहीत दाम्पत्यांनी एकमेकांना वेळ देण्याची गरज भासेल. स्वतःच्या उन्नतीसह कुटुंबाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न कराल. षष्ठ स्थानातील रवी, मंगळ, केतू या उष्ण ग्रहांमुळे वातावरणाशी मिळजुळते घेताना काळजी घ्यावी.

नोव्हेंबर :


पंचम स्थानातील कन्या राशीचा शुक्र आपले ध्येयावरील लक्ष विचलित करेल. विद्यार्थीवर्गाने विशेष काळजी घ्यावी. आजूबाजूला असलेल्या प्रलोभनांना भुलू नका. जोडीदारासह वैचारीक मतभेद होतील. त्याचे वादात रूपांतर होऊ देऊ नका. मूत्रविकार बळावतील. उष्णतेचा त्रास होईल. कलाविश्वात मन रमेल. नोकरी व्यवसायात नव्या संधी खुणावतील. नव्या संकल्पनांसाठी आखणी सुरू कराल. आपल्या प्रभावी सादरीकरणामुळे मान सन्मान मिळेल.

डिसेंबर :

राहूचे आपल्या व्यवस्थानातून लाभ स्थानातील मीन राशीत भ्रमण झाले आहे. आपला खरेपणा सर्वांना मान्य करावा लागेल. सप्तमतील रवी, मंगळ जोडीदाराला प्रगतिकरक ठरेल. संततीप्राप्तीसाठी थोडे सबुरीने घ्यावे लागेल. औषधांचा भडीमार सोसायचा नाही. नोकरी व्यवसायातील मेहनतीचे फळ मिळण्यास उशीर होईल पण सातत्य सोडू नका. विद्यार्थ्यांनी फक्त चंगळ वादाकडे लक्ष न देता अभ्यासाचे नियोजन आणि या नियोजनाचे अवलंबन करणे गरजेचे आहे. जोखीम पत्करताना आपल्या क्षमतेचा विचार जरूर करावा.

हे ही वाचा<< Aries Yearly Horoscope 2023: मेष राशीला धनलाभ कधी होणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

२०२३ या वर्षाच्या मध्यापासून विद्यार्थी वर्गाला विशेष खबरदारी घ्यावी लागेल. म्हणजे परीक्षा जवळ आल्यावर अभ्यासाचा ताण येणार नाही. शिक्षणासाठी परदेशी जाण्यास एप्रिलच्या आधी प्रयत्न करावेत. यंदाच्या वर्षात कामानिमित्त देशांतर्गत प्रवास कराल. एखादी परदेशवारी देखील संभवते. नोकरदार वर्गाला एप्रिलच्या आधी बढतीचा/ बदलीचा योग संभवतो. उत्पादक आणि सेवा पुरवणाऱ्या व्यवसायांना गती मिळेल. विवाहोत्सुक मंडळींनी एप्रिलच्या आधी वधू- वर संशोधनाला सुरुवात करावी. विवाहितांनी एकमेकांच्या न पटणाऱ्या गोष्टींवरून वाद टाळावा. संतानप्राप्तीचे प्रयत्न करण्यास वा वैद्यकीय सल्ला , उपचार घेण्यास एप्रिलपूर्वी सुरुवात करावी. मुलांच्या भावविश्वात शिरून नव्याने नाते जोपासावे. संवाद साधलात तर नात्याला सूर गवसेल. नातेवाईक आणि भावंडे यांच्यासाठी मदतीचा हात पुढे कराल. मित्रांना आपल्या भावनिक आधाराची गरज भासेल. आर्थिक गुंतवणूक डोळसपणे करावी. प्रलोभने, खोटी आकर्षक आश्वासने यांनी बळी पडू नका. लाभाचा आलेख फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये उच्च तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये नीच पातळीवर जाईल. जानेवारी ते एप्रिल हा कालावधी वाहन खरेदीस पूरक आहे. उत्सर्जनाचे त्रास होतील. जळजळ , अस्वस्थता वाढेल. वैद्यकीय उपचाराने लवकर आराम पडेल. व्यायाम आणि आहार याकडे विशेष लक्ष दिल्यास २०२३ हे वर्ष आरोग्यदायी जाईल.

Story img Loader