ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह संक्रमण किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी संयोग करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर झालेला दिसतो. २७ ऑक्टोबरपासून तूळ राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. सूर्य, केतू, शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने चतुर्ग्रही योग तयार होईल. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु तीन राशींचे लोक या काळात चांगली कमाई करू शकतात. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
- कन्या
चतुर्ग्रही योग तयार झाल्यामुळे या काळात तुम्ही चांगली कमाई करू शकता. कारण हा योग तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात तयार होणार आहे. ज्याला ज्योतिषशास्त्रात धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, तुम्ही व्यवसायात अनेक स्रोतांमधून पैसे कमवू शकाल. दुसरीकडे, जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला ते यावेळी मिळू शकतात. तसेच ज्या लोकांचे करिअर भाषण क्षेत्राशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे.
पुढील १४५ दिवसांसाठी शनिदेव राहणार मकर राशीमध्ये; ‘या’ राशींच्या नशिबाचे दार उघडणार
- मकर
चतुर्ग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण हा योग तुमच्या संक्रमण कुंडलीतून दहाव्या घरात तयार होणार आहे. जे कार्यक्षेत्र आणि नोकरीचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच, तुम्ही सध्या काम करत असलेल्या ठिकाणी तुम्हाला बढती किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता. त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळू शकते.
- कुंभ
चतुर्ग्रही योग तयार झाल्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीवरून नवव्या घरात हा योग तयार होणार आहे. ज्याला ज्योतिष शास्त्रात भाग्याचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळेल. तसेच दीर्घकाळ रखडलेली कामेही मार्गी लागतील.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)