ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेण्यास मदत करते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक संख्येनुसार अंकशास्त्रातही संख्या असतात. त्या क्रमांकाला भाग्यांक म्हटलं जातं. हा भाग्यांक आपल्याला जन्मतारीखेवरून काढता येतो. या भाग्यांकावरून आपल्याला आपले भविष्य समजू शकते. खरं तर, जन्मपत्रिकेत भाग्यांक दिलेला असतो. मात्र, ज्या व्यक्तींना त्यांचा भाग्यांक माहीत नाही, ती व्यक्ती स्वतः देखील भाग्यांक काढू शकते. कोणत्याही व्यक्तीचा भाग्यांक जाणून घेण्यासाठी त्याची जन्मतारीख जोडा. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म २७ तारखेला झाला असेल, तर २+ ७ = ९. अशा स्थितीत व्यक्तीचा भाग्यां ९ असेल. तर आज आम्ही तुम्हाला असे काही भाग्यांक सांगणार आहोत, कि त्या भाग्यांकासाठी येणारा पुढील आठवडा खूपच लकी ठरेल. त्यांना आश्चर्यचकित लाभ मिळतील.

भाग्यांक १

या आठवड्यात तुम्हाला कुठूनतरी अचानक लाभ होण्याची अपेक्षा आहे, तुम्ही काही शुभ कार्यात पैसे खर्च करू शकता. तुम्हाला कौटुंबिक आनंद मिळू शकतो, जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला खेळात चांगले यश मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, कुटुंबाशी स्नेह वाढेल. या आठवड्यात व्यापारात जोखीम घेणे टाळा, तरीही सर्वकाही नंतर सुरळीत होईल. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीला आरोग्याच्या समस्या असू शकतात.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Weekly Love Horoscope 9 To 15 December 2024
Weekly Love Horoscope 9 To 15 December 2024: हा आठवड्यात या राशींना प्रेमात मिळणार यश, जोडीदारासह आनंदाचे क्षण घालवणार हे लोक

( हे ही वाचा: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी येणारे ६ दिवस असतील खूपचं शुभ; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही)

भाग्यांक २

या आठवड्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु हळूहळू तुम्ही त्यावर मात करू शकता. तुमचे स्वतःचे वाहन असले तरी तुम्हाला दुसऱ्याचे वाहन वापरावे लागू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्ही आज सुस्त होऊ शकता. मात्र, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांना भेटू शकाल. नोकरदारांना पदोन्नतीच्या संधी निर्माण होतील.

भाग्यांक ३

या आठवड्यात काहींना संकटांनी घेरले असेल तरी हा आठवडा यशाने भरलेला आहे. तुमचा तुमच्या अधिकार्‍यांशी वाद होऊ शकतो. तुमचे मित्र तुमचे त्रास वाढवू शकतात, तुम्ही वाईट लोकांच्या संगतीत येऊ शकता. तुमचे मानसिक संतुलन गमावू नका, यामुळे तुमच्या कामात अडथळा येणार नाही. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. कलेची आवड वाढेल. व्यवसायासाठी वेळ चांगला आहे. या आठवड्यात आरोग्याचे विकार संभावतील त्यामुळे काळजी घ्या.

( हे ही वाचा: Astrology: यंदाचा पावसाळा तुमच्यासाठी ठरु शकतो लकी; ‘हे’ उपाय करून पहा)

भाग्यांक ४

तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे, तसेच काही पूर्वीची कामेही होतील. प्रतिष्ठित लोकांना भेटू शकाल, काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबासह बाहेर फिरायला जाऊ शकता. कार्यालयात मान-सन्मान वाढेल, अधिकारी आनंदी राहतील. काळजी घेण्याची नितांत गरज आहे, चांगल्या वेळेची धीराने वाट पहा. रक्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे.

भाग्यांक ५

काहीही बोलण्यापूर्वी काळजी घ्या, अन्यथा या आठवड्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता. आधी आरोग्याकडे लक्ष द्या, मग पैसे कमवण्याचा विचार करा. कोणत्याही कामाच्या चांगल्या-वाईट बाजू न तपासता घाईघाईने कोणतेही काम करू नका. व्यवसायासाठी हा आठवडा चांगला आहे पण व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता राहील. या आठवड्यात कोणालाही कर्ज देणे टाळा, कर्ज न घेतल्यास चांगले. आरोग्य सामान्य राहील.

( हे ही वाचा: Vastu Tips: तुळशीला जल अर्पण करताना ‘या’ चुका अजिबात करू नका; घरावर येईल संकट)

भाग्यांक ६

हा संपूर्ण आठवडा चांगला जाईल, तुम्ही काही शुभ कार्यात पैसे खर्च करू शकता. तुम्हाला कौटुंबिक आनंद मिळू शकेल, तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, तुम्ही मालमत्तेचे व्यवहार करू शकता, तुम्हाला खरेदी-विक्रीत नफा मिळू शकेल. अपूर्ण माहिती अपडेट करा. आरोग्य चांगले राहील, व्यवसायात नवीन दिशेने लक्ष द्या.

भाग्यांक ७

तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे, तसेच काही पूर्वीची कामेही पूर्ण होतील. कुटुंबासह बाहेर फिरायला जाऊ शकता. कार्यालयात मान-सन्मान वाढेल, अधिकारी आनंदी राहतील. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. काळजी घेण्याची नितांत गरज आहे, चांगल्या वेळेची धीराने वाट पहा. रक्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: ही चार रत्ने संपत्तीसाठी सर्वोत्तम मानली जातात; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आहेत अनुकूल)

भाग्यांक ८

हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे, तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. तुम्ही प्रतिष्ठित लोकांना भेटू शकता, तसेच काही चांगली बातमी मिळेल. कुटुंबासह तीर्थस्थळी जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही विद्यार्थी असाल तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा. या आठवड्यात जीवनसाथीसोबत चांगले संबंध निर्माण होतील, आरोग्यही चांगले राहील.

भाग्यांक ९

या आठवड्यात विश्रांती मिळणार नाही, कामाचा ताण जास्त राहील. तसेच काही महत्त्वाचे काम थांबू शकते, याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल, तुमच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घ्या. तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. विशेषत: अपरिचित महिलांशी संबंध ठेवू नका. कार्यालयात अधिका-यांशी मतभेद होऊ शकतात, एकूणच काळजीपूर्वक काम करावे लागेल. निर्णय घेण्याची घाई करू नका, वरिष्ठांचा सल्ला घेऊनच काम करा.

Story img Loader