हस्तरेखा शास्त्रात नखांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. खरंतर, नखांच्या आकारावरूनही व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत जाणून घेता येऊ शकते. नखांच्या रचनेवरून भविष्याबाबतही बरेच काही जाणून घेता येते. हस्तरेखा शास्त्रानुसार नखांच्या खास रचनेसोबत नशिबाचे वेगळेच कनेक्शन असते. आज आपण जाणून घेऊया नखांच्या रचना आणि त्यावरून मिळणाऱ्या संकेतांबाबत.
लांब आणि रुंद नखे :
हस्तरेषा शास्त्रानुसार अशी नखं असणारे लोक प्रेमाने परिपूर्ण असतात. तसेच ते खूप उत्साही असतात. असे लोक खूप सर्जनशील आणि कल्पक असतात. विपरीत परिस्थितीतही ते तग धरून राहतात.
रुंद नखे :
अशी नखं असलेले लोक खूप मोकळ्या मनाचे असतात. तसेच, ते कोणत्याही कामासाठी नशिबावर अवलंबून राहत नाहीत. अनेकदा ते त्यांच्या बुद्धिमत्तेने काम करतात आणि ते कामात नेहमी अव्वल असतात.
Health Tips : तोंडाची दुर्गंधी हे डायबेटीजचे लक्षण? माऊथ टेस्टमुळे होणार खुलासा
अंडाकृती किंवा गोलाकार नखे :
अशी नखं असलेल्या लोकांना त्यांच्या घरात जास्त वेळ राहणे आवडते. असे असले तरीही ते खूप सामाजिक देखील असतात. अशा लोकांचे संभाषण कौशल्य खूप चांगले असते. याशिवाय ते लोकांमध्ये सहज मिसळतात.
चौकोनी नखे :
असे लोक शांत आणि सहनशील असतात. ते नातेसंबंध गांभीर्याने जपतात. यासोबतच असे लोक काम आणि पैशाच्या बाबतीतही भाग्यवान सिद्ध होतात. याशिवाय त्यांच्यात नेतृत्व क्षमताही आहे.
टोकदार नखे :
अशी नखं असलेले लोक ध्येयाच्या दिशेने समर्पित असतात. त्यांना कोणतेही काम मिळाले तरी ते पूर्ण निष्ठेने करतात. तसेच, अशा लोकांचा कधीकधी संयम सुटतो. त्यामुळे अनेकदा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)