असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या हातात त्याचं नशीब दडलेलं असतं. लग्नानंतर व्यक्तीची अचानक प्रगती होऊ लागते, हे तुम्ही पाहिलंच असेल. तो आर्थिकदृष्ट्या मजबूत होतो. म्हणजे त्याचं नशीब चमकतं. खरं तर हस्तरेषा शास्त्रानुसार हातामध्ये विवाह रेषा असते. यासोबतच आणखीही अनेक गुण आहेत, ज्याच्या आधारे लग्नानंतर त्या व्यक्तीचे नशीब चमकेल की नाही हे ठरवता येते. जाणून घेऊया…
लग्नानंतर नशीब चमकते
हस्तरेषा शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या चंद्र पर्वतावरून भाग्यरेषा निघून शनीच्या पर्वतापर्यंत पोहोचली तर ती अत्यंत शुभ स्थिती असते. अशा लोकांना परदेशातून पैसा मिळतो. तसेच अशा लोकांचे नशीब लग्नानंतर चमकते.
वैवाहिक जीवन आनंदी होतं
हस्तरेषा शास्त्रानुसार तळहातातील सर्वात लहान बोटाखाली बुध पर्वताच्या रेषा पाहून देखील वैवाहिक जीवन जाणून घेता येते. असे मानले जाते की, या रेषा जितक्या स्पष्ट असतील तितके लग्नानंतर व्यक्तीला अधिक आनंद मिळतो. सुसंवाद देखील चांगला होतो.
लग्नानंतर श्रीमंत होतात
जर एखाद्या व्यक्तीच्या हातातील भाग्य रेषा बांगड्यापासून शनीच्या पर्वतापर्यंत गेली तर असे लोक लग्नानंतर खूप श्रीमंत होतात. अशा लोकांचे नशीब लग्नानंतर चमकते. लग्नानंतर ते श्रीमंत होतात.
आणखी वाचा : Chanakya Niti: जीवनात या गोष्टींना पाय लावू नका, आनंदाला लागेल गालबोट
यशामागे जोडीदाराचा हात असतो
हस्तरेषा शास्त्रानुसार, अंगठ्यापासून बृहस्पती पर्वतापर्यंत एखादी रेषा जात असेल, तर असे लोक लग्नानंतर अचानक आपल्या करिअरच्या उंचीला स्पर्श करतात. असे लोक अनेक स्त्रोतांमधून पैसे कमवतात. म्हणजे हे लोक लग्नानंतर यश मिळवतात. त्यांच्या यशामागे त्यांच्या जोडीदाराचाही हात असतो.
जन्मस्थानापासून दूर जाऊन पैसे कमवतात
चंद्र पर्वतावरून निघणारी भाग्यरेषा वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करू शकते. पण असे लोक लग्नानंतर जोडीदाराच्या मदतीने भाग्यवान ठरतात. असे लोक जन्मस्थानापासून दूर जाऊन पैसे कमावतात. तसेच लक्झरी लाइफ जगतात. त्यांचे छंद आणि मौजमजाही खूप महागडे असतात.