ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, आवड-नावड, व्यक्तिमत्त्व भिन्न असले तरीही ठराविक राशींच्या गुणांमध्ये साम्यता आढळून येऊ शकते. हे गुण व्यक्तीला यश मिळवण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे काही गोष्टी त्यांचे नुकसानही करू शकतात. आज आपण अशा राशींच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या बुद्धीने अतिशय तल्लख असतात, मात्र त्यांच्यात असलेल्या काही गोष्टींमुळे त्या स्वतःचे नुकसान करून घेऊ शकतात.

  • सिंह

ज्योतिषशात्रानुसार सिंह राशीच्या मुली थोड्या गर्विष्ठ असतात. दुसऱ्यांच्या आदेशांनुसार काम करणे त्यांना जमत नाही. त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी मोठे काम करायचे असते. त्या करिअरमध्ये शिखर गाठतात. मात्र या मुली इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि इथेच फसतात. यामुळे त्यांचे नुकसान होते.

Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mercury in Pisces will create Nichbhang Rajayoga
पैसाच पैसा! बुध ग्रह मीन राशीत निर्माण करणार नीचभंग राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
people born on this date are so rich and wealthy
‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात अत्यंत धनवान अन् श्रीमंत, आयुष्यात कमावतात गडगंज संपत्ती
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य,उच्च न्यायालयाची टिप्पणी; मुलगी गतिमंद असल्याच्या दाव्यावरूनही ताशेरे
Loksatta tatva vivek Popularization of Western philosophy
तत्व विवेक: पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचं लोकाभिमुखीकरण
Numerology : Shani Dev blessing on lucky zodiac signs
Shani Dev : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनिदेवाची विशेष कृपा, मिळतो अपार पैसा अन् पद- प्रतिष्ठा
  • वृश्चिक

असे म्हणतात, वृश्चिक राशीच्या मुली शांत स्वभावाच्या असतात. त्या आपले काम शांत पद्धतीने करणे पसंत करतात. तसेच, त्या अतिशय हुशार असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट नीट समजून घेणे आवडते. कोणतेही कार्य करण्याआधी ते त्या कामाशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊनच काम सुरु करतात. कामाच्या आड येणाऱ्या समस्यांना त्या धैर्याने सामोऱ्या जातात. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मुली एक चांगली मैत्रीण आणि पत्नी सिद्ध होतात.

Numerology: खूपच नशीबवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक; कुटुंबासाठीही ठरतात अत्यंत भाग्यवान

  • मेष

ज्योतिषशास्त्रात असे म्हटले गेले आहे की या राशींच्या मुली अतिशय उत्साही आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्या प्रत्येक काम मनापासून आणि उत्साहाने करतात. तसेच, ठरवलेली गोष्ट त्या साध्य करूनच दाखवतात. मात्र असे मानले जाते की या राशीचा स्वामी मंगल असल्याने त्यांना वैवाहिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

  • कर्क

कर्क राशींच्या मुली दिसायला अतिशय गंभीर आणि शांत असल्या तरीही त्यांची बुद्धी तल्लख असते. त्या कोणत्याही गोष्टी लगेच शिकतात. असे म्हणतात की या राशींच्या मुलींना येणाऱ्या धोक्यांबाबत आधीच कल्पना येते. त्यामुळे ते त्यांचं काम करताना विशेष खबरदारी घेतात. मात्र, या मुली अतिविचार करतात आणि यामुळेच अनेकदा त्यांचे नुकसान होते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader