ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल आणि राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. असाच एक शुभ राजयोग हा मालव्य योग आहे. हा योग पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो. या योगाच्या निर्मितीमुळे लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. तर येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये मालव्य राजयोग तयार होणार आहे, जो काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद आणू शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, धन, समृद्धी आणि सौभाग्याचा कारक शुक्र जेव्हा त्याची राशी वृषभ, तुळ किंवा मीन राशीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या स्थानी विराजमान असतो तेव्हा हा राजयोग तयार होतो. तर ३१ मार्च २०२३ रोजी दुपारी ४ वाजून ५४ मिनिटांनी शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया.
मिथुन रास
मिथुन राशीच्या दहाव्या स्थानी मालव्य राजयोग तयार होत असल्यामुळे या राशीच्या लोकांना सुखाची प्राप्ती होऊन त्यांची वाहन, घर, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच तुमचा नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अफाट यशा मिळू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
कर्क रास
कर्क राशीच्या नवव्या स्थानी मालव्य योग तयार होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना मार्च महिन्यात विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक संकटातून दिलासा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळू शकते. वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकता. अध्यात्माकडे तुमचा कल असू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.
कन्या रास
कन्या राशीच्या सातव्या स्थानी मालव्य राजयोग तयार होत आहे. या राशीच्या लोकांसाठी हा योग अनुकूल ठरू शकतो. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुम्ही प्रत्येक काम सहज पूर्ण करू शकता. शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळू शकतो. या काळात तुम्ही मित्र किंवा कुटुंबासह सहलीला जाऊ शकता. तुमच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे तुम्हाला समाजात सन्मान मिळू शकते. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)