मंगळ हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. २७ जून रोजी मंगळ स्वतःच्या राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करेल. तसे, मंगळाच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व १२ राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल. पण काही राशींना याचा जबरदस्त फायदा होणार आहे. 10 ऑगस्टपर्यंत मंगळ या राशीत राहणार आहे. आणि काही राशींना या काळात विशेष आर्थिक लाभ मिळणार आहेत. मेष आणि वृश्चिक राशींवर मंगळाचे राज्य आहे.
- मेष
या राशीच्या लोकांसाठी मंगळ संक्रमण शुभ ठरणार आहे. या काळात करिअरमध्ये चांगले परिणाम दिसून येतील. त्याच वेळी, जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर या कालावधीत तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. नोकरदारांसाठीही मंगळाचे हे संक्रमण लाभदायक आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. त्याचबरोबर लव्ह लाईफमध्येही शुभ संकेत दिसत आहेत.
सर्वोत्कृष्ट मुलगा आणि जावई सिद्ध होतात ‘या’ राशीची मुलं; सर्वांचे मन जिंकण्यात असतात पटाईत
- मिथुन
ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीसाठी देखील हे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. नोकरीत लाभ होईल. त्याचबरोबर उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील. उत्पन्न वाढेल. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा देखील सुधारेल. या काळात पदोन्नतीची दाट शक्यता आहे.
- सिंह
या काळात, या राशींच्या लोकांना नोकरी आणि व्यवसाय दोन्हीमध्ये यश मिळण्याची शक्यता दिसत आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. उत्पन्न वाढू शकते. एक नव्हे तर अनेक ठिकाणांहून पैसा वाढेल. आरोग्य चांगले राहील आणि समाजातील प्रतिमाही चांगली राहील.
- तूळ
भागीदारीत काम करत असाल तर चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. पाहिले तर हा काळ करिअरसाठी चांगला आहे. पण तूळ राशीच्या लोकांना प्रेमजीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)