Surya Grahan 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहण वेळोवेळी होत असतात. या ग्रहणांचा प्रभाव मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. तसेच ग्रहणाचा प्रभाव काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरु शकतो. अशातच आता या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जात आहे. कारण शास्त्रज्ञ याला खगोलीय घटना मानतात, तर ज्योतिषी ज्योतिषशास्त्रीय घटना मानतात. चला जाणून घेऊया सूर्यग्रहणाचा भारतावर आणि १२ राशींवर काय परिणाम काय होणार आहे ते जाणून घेऊया.

सूर्यग्रहणाची तारीख आणि वेळ –

वैदिक पंचांगानुसार २०२३ वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून ३३ मिनिटांनी सुरू होत असून ते पहाटे २.२४ वाजता संपेल. तर या दिवशी अमावस्या तिथी आहे. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे येथे सुतक कालावधी वैध राहणार नाही. हे सूर्यग्रहण अँटिग्वा, कॅनडा, ब्राझील, जमैका, अमेरिका, कोलंबिया इत्यादी देशांमध्ये पाहता येऊ शकते. पण तरीही त्याचा राशींवर थोडा प्रभाव राहू शकतो.

हेही वाचा- एका वर्षानंतर सूर्य राशी परिवर्तन करताच ‘या’ राशींच्या नशीबाला कलाटणी मिळणार? १७ सप्टेंबरपासून होऊ शकता धनवान

ग्रहणाचा १२ राशींवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

मेष : सूर्यग्रहणामुळे तुमचे मन थोडे विचलित होऊ शकते आणि काही आजारामुळे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या काळात शक्यतो बेफिकीर राहू नका.

वृषभ : कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. तसेच तुमचे पैसे काळजीपूर्वक खर्च करा. कारण या काळात खर्च वाढू शकतो.

मिथुन : ग्रहणाच्या प्रभावामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. तसेच तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.

कर्क : ग्रहणाच्या प्रभावामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे निष्काळजी न होता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

सिंह : वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात आणि एखाद्या विषयावर मानसिक अस्वस्थता असू शकते.

कन्या : काम आणि व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिकट होऊ शकतो. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

तूळ : राजकारणाशी संबंधित लोकांचे नुकसान होऊ शकते. नोकरदार लोकांशी कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. या काळात तुमचे मन थोडे उदास राहू शकते.

वृश्चिक : ग्रहणाच्या काळात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता, काही योजना यशस्वी होऊ शकतात, परंतु वैवाहिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

हेही वाचा- १७ सप्टेंबरपर्यंत ‘या’ राशींच्या कुंडलीत पैशाचा पाऊस? श्रावणाचा शेवटचा आठवडा कसा असेल? वाचा १२ राशींचे भविष्य

धनु : हे ग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

मकर : बेरोजगारांना या काळात नोकरी मिळू शकते आणि अचानक आर्थिक लाभही होण्याची शक्यता आहे. परंतु काही गोष्टींबद्दल मन अस्वस्थ राहू शकते.

कुंभ : ग्रहणाच्या प्रभावामुळे करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक ताकद येऊ शकते. नोकरदारांची त्यांच्या आवडीच्या ठिकाणी बदली होऊ शकते.

मीन : या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप कष्ट करावे लागू शकतात. परंतु व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)