वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रहांच्या चालीत बदल होणार आहे. अशा परिस्थितीत १२ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही ना काही बदल होऊ शकतो. या महिन्यात सूर्य, शुक्र, राहू, केतू आणि बुध हे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिषांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या हालचाली काही राशींना विशेष लाभ देऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात कोणते ग्रह कोणत्या राशीत कधी प्रवेश करत आहेत आणि त्याचा परिणाम काय होणार आहे ते जाणून घेऊया.
ऑक्टोबर २०२३ मधील ग्रहांचे गोचर –
कन्या राशीत बुधाचे गोचर
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुद्धीचा कारक आणि ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह १ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ८ वाजून २९ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
शुक्राचे सिंह राशीत गोचर
राक्षसांचा स्वामी शुक्र २ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री १२ वाजून ४३ मिनिटांनी सिंह राशीत गोचर करणार आहे.
मंगळाचे तुळ राशीत गोचर –
ग्रहांचा सेनापती मंगळ ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजून १२ मिनिटांनी तूळ राशीत गोचर करत आहे.
हेह वाचा- मंगळ स्वराशीत प्रवेश करताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? अपार धनलाभ होण्याची मोठी शक्यता
सूर्याचे तुळ राशीत गोचर –
वैदिक ज्योतिषशास्त्रात सुर्याला नऊ ग्रहांचा प्रमुख मानले जाते. ग्रहांचा राजा सूर्य १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी तूळ राशीत गोचर करणार आहे.
बुधाचे तूळ राशीत गोचर
बुध हा बुद्धी आणि वाणीचा कारक मानला जातो. बुध १९ ऑक्टोबरला कन्या राशीतून दुपारी १ वाजून ६ मिनिटांनी बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
राहूचे मीन राशीत गोचर
ऑक्टोबर महिना खूप खास आहे, कारण या महिन्यात, पापी ग्रह राहू वक्री होणार असून तो ३० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून १३ मिनिटांनी मंगळाच्या मेष राशीतून बाहेर पडून देवगुरुच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे.
केतूचे कन्या राशीत गोचर
राहूसह केतू देखील या महिन्यात राशी बदल करणार आहे. तर जवळपास दीड वर्षांनी केतू ३० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून १३ मिनिटांनी शुक्राची राशी तुळमध्ये प्रवेश करणार आहे. तर या राशीमध्ये सूर्य आणि बुध आधीच विराजमान आहेत.
ग्रहांचे गोचर झाल्यामुळे ‘या’ राशींना फायदा होणार –
ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्यात बुध, शुक्र, सूर्य, राहू, केतू यांच्या राशी परिवर्तनामुळे मिथुन, सिंह, कन्या आणि धनु राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या काळात यश मिळू शकते. तर नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते, वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूश होऊन तुम्हाला प्रमोशनसह मोठ्या जबाबदाऱ्या देऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित अनेक मोठे व्यवहार केले जाऊ शकतात. तसेच व्यवसायात गुंतवणूक केल्यास अनेक पटींनी जास्त नफा मिळू शकतो. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. शिवाय या महिन्यात तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी राहू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)