ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेण्यास मदत करते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक संख्येनुसार अंकशास्त्रातही संख्या असतात. त्या क्रमांकाला भाग्यांक म्हटलं जातं. हा भाग्यांक आपल्याला जन्मतारीखेवरून काढता येतो. या भाग्यांकावरून आपल्याला आपले भविष्य समजू शकते. खरं तर, जन्मपत्रिकेत भाग्यांक दिलेला असतो. मात्र, ज्या व्यक्तींना त्यांचा भाग्यांक माहीत नाही, ती व्यक्ती स्वतः देखील भाग्यांक काढू शकते. कोणत्याही व्यक्तीचा भाग्यांक जाणून घेण्यासाठी त्याची जन्मतारीख जोडा. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म २४ तारखेला झाला असेल, तर २ + ४ = ६. अशा स्थितीत व्यक्तीचा भाग्यां ६ असेल. तर आज आम्ही तुम्हाला असे काही भाग्यांक सांगणार आहोत, कि त्या भाग्यांकासाठी येणारे पुढचे ६ दिवस खुपचं शुभ असतील. जर तुमचा देखील भाग्यांक यामध्ये समाविष्ट असेल तर जाणून घ्या येणारे पुढचे सहा दिवस तुमच्यासाठी कसे असतील.

भाग्यांक १

ज्या व्यक्तीचा भाग्यांक १ आहे ती खूप भाग्यवान समजली जाते. यापुढचे ६ दिवस या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहेत. या सहा दिवसात त्यांना चांगला नफा होईल. तसच वैवाहिक जीवनात काही मतभेत असतील, तर ते दूर होतील. हा भाग्यांक असलेल्या व्यक्तींच्या कामात येत्या सहा दिवसात यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जे काम करताय, त्यामध्ये तुमचे कौतुक होण्याची देखील संभावना आहे. त्यामुळे तुम्ही जर एखादे काम सुरू करण्याच्या तयारीत असाल, तर हे ६ दिवस तुमचं काम सुरू करण्यासाठी खूप चांगले दिवस आहेत.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Rashi Bhavishya In Marathi
१० जानेवारी पंचांग: पुत्रदा एकादशीला १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख आणि सौभाग्य? भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होणार का? वाचा राशिभविष्य

( हे ही वाचा: Astrology: ‘या’ राशींच्या मुली असतात कामात कुशल, असतो चंचल स्वभाव)

भाग्यांक ४

ज्या व्यक्तींचा भाग्यांक ४ आहे, ते खूप महत्वकांक्षी असतात. येत्या सहा दिवसात ४ भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींना भरपूर फायदा मिळणार आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल, तर लवकरच त्या ठिकाणी सर्वजण तुमची प्रशंसा करतील. तसचं पुढचे सहा दिवस, व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी शुभ आहेत. त्यामुळे जर तुम्ही एखादा व्यवहार करत असाल, तर बिनधास्त करू शकता. तसचं जर तुम्हाला काही आर्थिक समस्या असेल, तर ती येत्या सहा दिवसात निघून जाईल.

भाग्यांक ७

ज्या व्यक्तींचा भाग्यांक ७ आहे, ती लोक स्वावलंबी असतात , स्वतः मेहनत करून भविष्य घडवण्याची ताकत या व्यक्तींमध्ये असते. तर तुमचा देखील यात समावेश असेल, तर तुमच्यासाठी येणारे सहा दिवस खूप महत्वाचे असतील. या व्यक्तींना येत्या ६ दिवसात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसंच जर तुम्ही एखादा व्यवहार किंवा गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, तर येत्या सहा दिवसात करू शकता. तुम्हाला चांगला फायदा होईल. प्रेमीयुगलांसाठी हे सहा दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. तुम्ही या दिवसात तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता. त्याचप्रमाणे काही मतभेत असतील, तर ते देखील या येत्या दिवसात नाहीशे होतील.

( हे ही वाचा: Vastu Shastra: घराच्या ‘या’ दिशेला लावा पोपटाचे चित्र; सर्व दोष नष्ट होतील)

भाग्यांक ९

ज्या व्यक्तींचा भाग्यांक ९ आहे त्या लोकांना येत्या सहा दिवसात चांगला नफा होण्याची संभावना आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्या पदात येत्या सहा दिवसात वाढ होईल. त्यामुळे मेहनतीने काम करा. त्याचबरोबर येत्या सहा दिवसात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तसंच जर तुम्ही एखादी नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर हे सहा दिवस तुमच्यासाठी शुभ असतील.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader