Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेण्यास मदत करते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक संख्येनुसार अंकशास्त्रातही संख्या असतात. त्या क्रमांकाला भाग्यांक म्हटलं जातं. हा भाग्यांक आपल्याला जन्मतारीखेवरून काढता येतो. या भाग्यांकावरून आपल्याला आपले भविष्य समजू शकते. खरं तर, जन्मपत्रिकेत भाग्यांक दिलेला असतो. मात्र, ज्या व्यक्तींना त्यांचा भाग्यांक माहीत नाही, ती व्यक्ती स्वतः देखील भाग्यांक काढू शकते. कोणत्याही व्यक्तीचा भाग्यांक जाणून घेण्यासाठी त्याची जन्मतारीख जोडा. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म २२ तारखेला झाला असेल, तर २+ २ = ४. अशा स्थितीत व्यक्तीचा भाग्यां ४ असेल. तर आज आम्ही तुम्हाला असे काही भाग्यांक सांगणार आहोत, कि तो भाग्यांक असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात येणारे ९ दिवस वरदानाचे ठरतील. तर जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही.

भाग्यांक ३

भाग्यांक ३ असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्ही जिथे काम करत असाल त्या प्रत्येक कामात यश मिळेल. पुढच्या ९ दिवसात आर्थिक बाजू मजबूत राहील. या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांचे सहकार्य मिळेल. तसंच पुढचे ९ दिवस तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

( हे ही वाचा: श्रावण महिन्यात या ५ राशींवर सूर्य देवाची कृपा होईल; धन-संपत्तीत देखील होईल वाढ)

भाग्यांक ४

भाग्यांक ४ असणाऱ्या व्यक्तींचा आत्मविश्वास येत्या ९ दिवसात वाढेल. तसंच त्यांना नोकरी-व्यवसायात देखील लाभ होईल. या कालावधीत तुम्ही जिथे काम करत असाल, त्याठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. येत्या ९ दिवसात तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर काही समस्या असतील तर त्या येत्या ९ दिवसात दूर होतील. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल. याने तुमच्या वैवाहिक आयुष्यात असणाऱ्या समस्या दूर होतील.

भाग्यांक ५

नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही. येत्या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. वैवाहिक आयुष्यात काही समस्या असतील त्या दूर होऊन तुमचे जीवन आनंदी राहील. येत्या ९ दिवसात तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. त्यामुळे घरचं वातावरण चांगले राहील. येत्या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल, तर बिनधास्त करू शकता. तसंच तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची देखील संधी मिळेल.

( हे ही वाचा: Shravan 2022: श्रावणाचा पवित्र महिना लवकरच सुरू होतोय; जाणून घ्या उपवासाच्या खास टिप्स)

भाग्यांक ८

येत्या ९ दिवसात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात तुम्हाला पैसा आणि नफा होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत असाल, अशा ठिकाणी तुमच्या प्रतिष्ठेत आणि पदात वाढ होईल.
तसंच नोकरी आणि व्यवसायात देखील लाभ होण्याची शक्यता आहे. या ९ दिवसात तुम्ही सामाजिक कार्यात भाग घ्याल.

Story img Loader