ज्योतिष शास्त्रानुसार वेळोवेळी होणाऱ्या ग्रहांच्या बदलाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होतो. एका राशीचा दुसऱ्या राशीत प्रवेश होण्याला संक्रमण म्हणतात. या संक्रमणाचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसू शकतो. हे संक्रमण काहींसाठी भाग्यदायी तर काहींसाठी अशुभ ठरते. मंगळ ग्रहाने २७ जून रोजी मेष राशीत प्रवेश केला असून तो १० ऑगस्टपर्यंत या राशीत राहील. विशेषतः तीन राशींवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव दिसून येणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • मिथुन

उत्पन्न आणि लाभाचे घर मानल्या जाणाऱ्या या राशीच्या कुंडलीतून मंगळाचे ११व्या घरात भ्रमण होत आहे. या काळात उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्यवसायातही चांगला नफा होईल. मंगळाचे संक्रमण तुमची आर्थिक बाजू मजबूत करेल. तसेच यादरम्यान तुमच्या कार्यशैलीतही सुधारणा होईल. या काळात बॉसचे सहकार्य मिळेल. मिथुन राशीच्या सातव्या घरातील स्वामी ग्रह मंगळ आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. या लोकांना पन्ना रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो.

Zodiac Compatibility: ‘या’ राशींच्या जोड्या ठरतात सर्वोत्कृष्ट! जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणत्या राशीचा जोडीदार असेल योग्य

  • कर्क

कर्क राशीच्या दशमस्थानात मंगळाचे संक्रमण झाले आहे. हे कार्यक्षेत्र आणि नोकरीची भावना मानली जाते. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर हा काळ अनुकूल आहे. मंगळ संक्रमणामध्ये मालमत्ता आणि वाहनाच्या व्यवहारातही चांगले आर्थिक लाभ होतील. व्यवसायात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. या दरम्यान, मोती रत्न धारण करणे अनुकूल सिद्ध होईल.

Astrology : नकळतही करू नयेत ‘या’ चुका; अन्यथा शुक्र, शनि, गुरू देतील अशुभ परिणाम

  • सिंह

तुमच्या राशीच्या नवव्या घरात हे संक्रमण झाले असून हे भाग्य आणि परदेश प्रवासाचे घर मानले जाते. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्याचबरोबर बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे होताना दिसतील. या दरम्यान, व्यवसायाच्या संदर्भात प्रवास होण्याची शक्यता आहे, जी भविष्यात फायदेशीर ठरू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांनाही नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या राशीचे लोक विशेष लाभासाठी कोरल रत्न घालू शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)