ग्रह बदलांच्या दृष्टीने मार्च महिना खूप खास आहे. मार्च २०२२ मध्ये तीन महत्त्वाचे ग्रह राशी बदलत आहेत. ज्याचा सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. मार्चच्या सुरुवातीला बुध ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी, १५ मार्च २०२२ला सूर्य कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल. यानंतर महिन्याच्या शेवटच्या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या स्थितीतील हे मोठे बदल ४ राशीच्या लोकांना जोरदार लाभ देणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष :

मार्चमध्ये होणारे हे ग्रह बदल मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देतील. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी-व्यवसाय दोन्हीसाठी हा काळ चांगला आहे. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यावसायिकांना मोठे सौदे होऊ शकतात. आत्मविश्वास उच्च राहील.

वृषभ :

३१ मार्च २०२२ पर्यंतचा काळ वृषभ राशीच्या लोकांना अनेक प्रकारे लाभदायक ठरेल. तुम्हाला मोठी वेतनवाढ मिळू शकते किंवा नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. ही ऑफर उच्च स्थान आणि भरीव पॅकेज मिळवून देऊ शकते. याशिवाय कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कोणतेही मोठे काम पूर्ण होऊ शकते.

मृत्यूच्या आधी माणूस करत असतो ‘या’ गोष्टींचा विचार; वैज्ञानिकांनी शोधून काढली धक्कादायक माहिती

मिथुन :

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठे यश मिळवून देईल. कामाच्या पद्धतीत काही बदल कराल जे खूप फायदेशीर ठरतील. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. उत्पन्न वाढेल.

मकर :

मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती राजयोग बनवत आहे. हा राजयोग उत्तम यश मिळवून देईल आणि भरपूर पैसा देखील मिळवेल. विशेषत: व्यापारी आणि मार्केटिंग करणार्‍यांसाठी ३१ मार्चपर्यंतचा काळ सर्वात फायदेशीर आहे.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)