Surya Nakshtra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. तसेच वेळोवेळी सूर्याचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे आणि तूळ सूर्याची नीच राशी आहे. शनिवारी (८ जून) सूर्याचे नक्षत्र परिवर्तन होणार असून, या दिवशी सूर्य १ वाजून १६ मिनिटांनी रोहिणी नक्षत्रातून मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींच्या लोकांना त्याचा चांगला फायदा होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींनादेखील सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा चांगला फायदा पाहायला मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. समाजात मान-सन्मान वाढेल.

तूळ

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल.

हेही वाचा: पुढचे २ दिवस बक्कळ पैसा; चंद्र-गुरु निर्माण करणार ‘गजकेसरी राजयोग’, ‘या’ तीन राशी होणार मालामाल

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठीदेखील सूर्याचे हे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीदेखील सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन खूप खास असेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The sun will do the goods these five zodiac signs will get happiness prosperity and wealth with nakshatra transformation sap