दर महिन्याला काही ग्रह राशी बदलतात. जुलै महिना सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत येणारा महिना आपल्यासाठी कसा जाणार आहे हे प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते. जुलैमध्ये पाच मोठे ग्रह संक्रमण करणार आहेत. आणि त्याचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर दिसून येईल. जुलैच्या सुरुवातीलाच बुध ग्रहचे संक्रमण होईल. त्याच वेळी, महिन्याच्या शेवटी, गुरु संक्रमण राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करेल. संपूर्ण जुलै महिन्यात पाच मोठे ग्रह आपली स्थाने बदलतील. जाणून घेऊया कोणत्या राशींवर त्याचा प्रभाव दिसेल.
- बुध संक्रमण
जुलैमध्ये बुध ग्रह तीनदा संक्रमण करणार आहे. अशा स्थितीत २ जुलै रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत संक्रमण करेल. त्यानंतर १६ जुलै रोजी संक्रमण होईल. त्यानंतर ३१ जुलै रोजी बुधाचा सिंह राशीत प्रवेश झाल्यामुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होईल. बुधाच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व लोकांच्या जीवनावर दिसून येईल. हे संक्रमण काहींसाठी फायदेशीर तर काहींसाठी हानिकारक ठरणार आहे.
- शनि संक्रमण
१२ जुलै रोजी शनि प्रतिगामी मार्गाने मकर राशीत प्रवेश करेल आणि २३ ऑक्टोबर रोजी या राशीतून मार्गी होईल. त्याचा परिणाम अनेक राशींच्या जीवनावर दिसून येईल. काही राशींना या काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. या दरम्यान नोकरदार लोकांना त्यांच्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अन्यथा प्रमोशन थांबू शकते.
Astrology : ‘हे’ संकेत मिळाले तर समजून जा, तुमच्यावर आहे शनिची कृपादृष्टी; लवकरच मिळेल शुभवार्ता
- शुक्र संक्रमण
तिसरा प्रमुख ग्रह शुक्र देखील १३ जुलै रोजी मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. सूर्य आणि बुध हे ग्रह आधीच मिथुन राशीत विराजमान आहेत. अशा प्रकारे त्रिघी योग तयार होत आहे. या योगाने अनेक राशीच्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल.
- सूर्य संक्रमण
ग्रहांचा राजा सूर्य देखील मिथुन सोडून १६ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर १७ ऑगस्टपर्यंत तो या राशीत असेल. या काळात कर्क राशीत होणारा प्रवेश कर्क संक्रांती म्हणून ओळखला जाईल. सूर्याचे हे संक्रमण काही राशींसाठी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देईल.
- गुरु मार्गी
जुलैच्या शेवटी, गुरु ग्रह प्रतिगामी होईल. २८ जुलैचा गुरु प्रतिगामी गतीने वाटचाल सुरू करेल आणि २४ नोव्हेंबरपर्यंत येथे राहील. गुरुमार्गाचा प्रभाव अनेक राशींचा जीवनात दिसून येईल.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)