ज्योतिषशास्त्रात ९ ग्रह, १२ राशी आणि २७ नक्षत्रांचा उल्लेख आहे. याच्या आधारे प्रत्येक राशीच्या लोकांची स्वतःची वैशिष्ट्ये काय आहेत याचा अंदाज बांधला जातो. आज आपण अशा २ राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यावर हनुमान आणि मंगळ देवाची विशेष कृपा असते. मंगळाच्या कृपेने या लोकांना त्यांच्या कार्यात सहज यश मिळते.
मेष (Aries) : मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि हनुमानजी हे या राशीचे देवता मानले जातात. यामुळे या राशीचे लोक खूप धाडसी आणि निडर असतात. हे लोक कोणत्याही आव्हानाला घाबरत नाहीत. त्यामुळे ज्या कामात धोका आहे त्या क्षेत्रात काम करायला आवडते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातही ते खूप यशस्वी होतात. सामान्यतः या राशीचे लोक धोकादायक व्यवसाय आणि (Adventure Activities) आवडणारे लोक असतात. जोखीम घेण्याची क्षमता त्यांना जीवनात लवकर यश मिळवून देते.
आणखी वाचा : “मी एका कपलसोबत ‘Throuple Relationship’मध्ये होते”; सायशा शिंदेने केला धक्कादायक खुलासा
नकारात्मक पैलू : या लोकांमध्ये नकारात्मक पैलू देखील आहेत. या लोकांना खूप लवकर राग येतो आणि ते लवकर शांत होत नाहीत. हे लोक आपला अपमान सहन करू शकत नाहीत आणि बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात. हे लोक आपली चूक कधीच मान्य करत नाही, त्यामुळे त्यांचे नुकसानही होते.
आणखी वाचा : “आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
वृश्चिक (Scorpio) : या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि बजरंगबली ही प्रमुख देवता आहे. हे लोक देखील मेष राशीच्या लोकांसारखे निर्भयी असतात. हे लोक कितीही मोठ्या संकटात सापडले तरी आपल्या बुद्धिमत्तेने त्यातून बाहेर पडतात. हे लोक चतुराईने प्रत्येक प्रश्न सोडवतात. लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात याची त्यांना पर्वा नसते, ते फक्त त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि यशस्वी होतात.
आणखी वाचा : “माझं कौमार्य विकून मुलगी सोनाक्षीला अभिनेत्री बनवले”, अभिनेत्रीने केला शत्रुघ्न सिन्हांवर आरोप
नकारात्मक पैलू : या राशीचे लोक खूप स्वार्थी असतात. आपले काम मार्गी लावण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. त्यांना स्वतःच्या मर्जीनुसार आयुष्य जगायला आवडते आणि त्यांच्या या स्वभावामुळे अनेक लोक दुखावतात.
आणखी वाचा : “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले!”, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी वादावर हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत
या दोन्ही राशीच्या लोकांनी हनुमानजींची पूजा केल्यास त्यांना त्यांच्या कार्यात अधिक यश मिळते.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)