Mangal Gochar in Mesh Rashi: ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रहाच्या राशी बदलाची वेळ सांगितली आहे. मंगळ देखील ठराविक काळानंतर राशी बदलत राहतो. वैदिक ज्योतिषात मंगळ हा भूमी, विवाह, धैर्य यांचा कारक मानला जातो. मंगळ सध्या मेष राशीत बसला आहे. मंगळाने २७ जून रोजी मेष राशीत प्रवेश केला होता आणि १० ऑगस्टपर्यंत या राशीत राहील. तसंच यावर्षी १२ एप्रिल २०२२ रोजी राहूने देखील मेष राशीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत राहु आणि मंगळ हे मेष राशीत आहेत, ज्यामुळे अंगारक योग तयार होतो. अंगारक योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानला जात नाही. मात्र आगामी काळात हा योग अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे येणाऱ्या २० दिवसात काही राशींना सावध राहणे गरजेचे आहे. तर जाणून घ्या या ४ राशींबद्दल ज्यांना येते २० दिवस त्रासदायक ठरू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ

मंगळाने वृषभ राशीच्या बाराव्या घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. नोकरदारांनी या काळात सावध राहावे. व्यापाऱ्यांनी शहाणपणाने निर्णय घेणे आवश्यक आहे. शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात.

( हे ही वाचा: १६ जानेवारी २०२३ पर्यंत शनिदेव या ३ राशींना आशीर्वाद देतील; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही)

कन्या

मंगळ तुमच्या राशीच्या आठव्या घरात प्रवेश करत आहे. ज्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या काळात तुमचे खर्च वाढू शकतात. वादापासून दूर राहा. बोलण्यात संयम ठेवा. या काळात वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतील त्यामुळे संयमाने वागा.

तूळ

मंगळ तुमच्या राशीच्या सातव्या घरात प्रवेश करत आहे. यामुळे तुम्हाला संमिश्र परिणाम मिळू शकतात. भागीदारीच्या कामात तुम्हाला चढ-उतार दिसतील. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. मन उदास राहू शकते. तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी येणारे ९ दिवस वरदानाचे ठरतील; नोकरी – व्यवसायात येतील लाभाचे योग)

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या सहाव्या भावात मंगळाचे संक्रमण झाले आहे. ज्यामुळे तुम्हाला अशुभ परिणाम मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात. कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These 4 rashis should be cautious in the coming 20 days may cause great damage gps
Show comments