शास्त्रांमध्ये शनि देवाला न्यायाची देवता म्हटले गेले आहे. असे म्हणतात, शनिदेव कोणालाही त्याच्या कर्मानुसार फळ देतात, मग ते वाईट असो किंवा चांगले. शनिदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. आयुष्यातील दु:ख दूर होतात. कपट, मत्सर आणि द्वेषापासून दूर असलेल्या व्यक्तीवर शनिदेव कधीही अन्याय होऊ देत नाहीत, असेही म्हटलं गेलंय. शनिदेव अशा देवतांपैकी एक आहेत, ज्यांचा राग एकदा कुणावर आला तर ते लवकर शांत होत नाहीत. तसेच अशा व्यक्तीला शनिची साडेसाती आणि धैय्याला दीर्घकाळ तोंड द्यावे लागते.
तसे, प्रत्येकजण शनिच्या साडेसातीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात असतो. मात्र नकळत आपल्या हातून अशा काही चुका होतात, ज्यामुळे शनिदेवाचा राग आपण ओढवून घेतो. असे काही संकेत आहेत, जे आपल्याला दर्शवतात की शनिदेव आपल्यावर नाराज आहेत आणि आपल्याला त्यांच्या प्रकोपाला सामोरे जावे लागणार आहेत. आज आपण याच संकेतांबद्दल जाणून घेऊया.
जुलैमध्ये जन्माला आलेले लोक असतात खूपच खास; मिळवतात अफाट यश आणि प्रसिद्धी
- शनिवारी काम बिघडणे
काम बिघडणे हा आपल्या आयुष्याचाच एक भाग आहे. मात्र शनिवार सारख्या दिवशी जर आपले एखादे महत्त्वाचे काम बिघडत असेल तर ही चिंताजनक बाब आहे. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस विशिष्ट देवांना समर्पित आहे. शनिवार हा दिवस शनिदेवाचा आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की शनिवारच्या दिवशी जर एखादे काम बिघडले तर हे शनिदेव आपल्यावर नाराज असल्याचे लक्षण आहे. यासाठी शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा.
कधी आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार? जाणून घ्या उपासनेची योग्य विधी
- खोटं बोलणे
एखाद्या प्रसंगातून स्वतःचा बचाव करण्यासाठी व्यक्ती अनेकदा खोटं बोलते. खोटं बोलणे चुकीचे आहे हे आपल्याला लहानपणापासून शिकवले गेले आहे. असे असतानाही लोकं खोटं बोलतात. मात्र, खोटे बोलण्याची सवय देखील एक प्रकारचा संकेत आहे, जे सांगते की शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत. असे मानले जाते की शनिदेव हे न्यायाचे देवता असून खोटे बोलणारे लोक त्यांना आवडत नाहीत. जर तुम्हाला वारंवार खोटे बोलण्यास भाग पाडले जात असेल, तर कदाचित शनिदेव तुमच्यावर कोपले असतील. त्यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडावर मोहरीचे तेल, काळे तीळ आणि काळे वस्त्र अर्पण करावे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)