शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक विविध उपाय करतात. शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल, काळे तीळ अर्पण करावे, त्यांची पूजा करावी व व्रत करावे. जेणेकरून शनिचा प्रकोप टाळता येईल. शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात. ज्या लोकांच्या कुंडलीत शनि बलवान असतो, त्यांना आयुष्यात कोणतीही समस्या येत नाही. कमकुवत शनि व्यक्तीला शारीरिक आणि आर्थिक समस्यांनी घेरून ठेवतो. ज्योतिष शास्त्रानुसार शनिच्या प्रिय राशींना शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागत नाही किंवा कमी वाईट प्रभावांना सामोरे जावे लागत नाही. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
- तूळ
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांवर शनिची विशेष कृपा असते. ही शनिदेवाची उच्च राशी मानली जात असून ती शनिदेवाच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. हे लोक खूप मेहनती असतात. ते कोणाचीही चुकीची गोष्ट खपवून घेत नाहीत. त्यांना सत्याच्या बाजूने उभे राहणे आवडते. तूळ राशीच्या लोकांवर शनिची दशा इतर राशींच्या तुलनेत कमी प्रभावित करते.
जुलैमध्ये जन्माला आलेले लोक असतात खूपच खास; मिळवतात अफाट यश आणि प्रसिद्धी
- मकर
या राशीचा अधिपती ग्रह शनि आहे. यामुळे ही रास शनिच्या आवडत्या राशींमध्ये गणली जाते. हे लोक खूप बुद्धिमान मानले जातात. एवढेच नाही तर मेहनतीच्या जोरावर ते पटकन यश मिळवतात. ते मेहनती आहेत आणि सहजासहजी हार मानत नाहीत. त्यांच्यावर शनिदेवाचा वाईट प्रभाव लवकर पडत नाही.
- कुंभ
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. हे लोक स्वभावाने साधे आणि सहनशील असतात. एखादे काम करायचे ठरवल्यावर, ते पूर्ण करूनच दाखवतात. या लोकांची आर्थिक स्थितीही चांगली असते. हे लोक लवकर हार मानत नाहीत.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)