Numerology Predictions: ज्योतिषशास्त्रातील एक शाखा म्हणजेच अंकशास्त्र. तुमच्या जन्मदिनाच्या तारखेनुसार तुमचा स्वभाव, व्यक्तिमत्व व भविष्य यांचे अंदाज बांधण्याची शाखा म्हणजे अंकशास्त्र. ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे कुंडली व ग्रहांच्या आधारे भविष्याचे अंदाज बांधले जातात त्याप्रमाणेच अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून काढलेल्या मूलांकावरून विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ १, १०, १९, २८ या जन्मतारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा मूलांक असतो १. आज आपण १ हा मूलांक असलेल्या आणि वरील चार जन्मतारखेला जन्मलेल्या मंडळींच्या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेणार आहोत. तसेच कोणत्या स्थितीत ही मंडळी भाग्योदय, धनलाभ व मान- सन्मान मिळवू शकतात हे सुद्धा जाणून घेणार आहोत.
स्वभाव वैशिष्ट्य
मूलांक १ असणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीचे स्वामी हे सूर्यदेव असतात. सूर्याच्या प्रभावाने या व्यक्ती तेजस्वी, प्रभावी, व उत्तम नेतृत्व करण्यास सक्षम असतात. यांच्यात जन्मापासूनच लीडर बनण्याचे गुण असतात. विशेषतः राजकारण व समाजकारणात आपल्या ओघवत्या वक्तृत्वाने ही लोकं विशेष छाप पाडू शकतात. या मंडळींना आयुष्यात कधीच प्रसिद्धी व सन्मानाची कमतरता भासत नाही असे मानले जाते.
१ हा मूलांक असलेल्या मंडळींची एक खास गोष्ट म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वात एका प्रकारची आकर्षक वैशिष्ट्य असतात. यांच्यातील आत्मविश्वास हा इतरांना सुद्धा आयुष्यात उंच भरारी घेण्यास प्रोत्साहन देऊ शकतो. ही मंडळी आव्हानांना घाबरत नाहीत व शिस्तीचे आयुष्य जगण्यासाठी ओळखली जातात.
धनलाभाचे स्रोत व विवाहयोग
१ हा मूलांक असणाऱ्या मंडळींवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो पण त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला मेहनतीला विराम देता येणार नाही. तुम्हाला येत्या काळात एक एक पैसा जोडून गुंतवणुकीवर भर द्यावा लागू शकतो.
हे ही वाचा << ‘या’ ५ राशींना शनी जयंती पासून लाभणार प्रचंड श्रीमंती? १९ मे पासून वर्षभर अनुभवू शकता प्रेमळ शुक्राचे चांदणे
तुम्हाला वाडवडिलांची साथ लाभू शकते. यातूनच मानसिक ताण सुद्धा वाट्याला येऊ शकतो पण तात्पुरता त्रास बाजूला ठेवून आपल्याला बचत व मिळकतीचे स्रोत यावर लक्ष द्यावे लागू शकते. या मंडळींचे विवाहयोग्य वय २७ च्या नंतर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)