आपल्याला पडणारी स्वप्ने आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडत असतात. ते आपल्या मनालावरच नाही तर आपल्या भविष्यावरही परिणाम करतात. त्यांच्याकडून प्राप्त होणारे शुभ आणि अशुभ संकेत स्वप्न शास्त्रात विस्ताराने सांगितले आहेत. आज आपण अशा स्वप्नांविषयी जाणून घेऊया ज्यांचा थेट संबंध न्यायाची देवता शनि देवासोबत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जर तुम्हाला शनिदेवाशी संबंधित स्वप्न पडले असेल तर ते तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल घडणार असल्याचे संकेत आहे. हे सांगतात की शनिदेव तुमच्यावर कृपा करणार आहेत की तुम्हाला त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागेल.
- स्वप्नात शनिदेवाची मूर्ती किंवा चित्र दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की येणारा काळ तुम्हाला आनंदही देऊ शकतो किंवा एखाद्या मोठ्या संकटातही टाकू शकतो. व्यक्तीला त्याच्या कुंडलीत शनिच्या स्थितीनुसार या स्वप्नाचे फळ मिळते. परिस्थिती शुभ असेल तर चांगले परिणाम मिळतील.
- स्वप्नात शनिदेवाने आशीर्वाद दिल्यास हे स्वप्न खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ शनिदेव तुमच्या जीवनातील सर्व संकटे संपवणार आहेत. जर एखाद्या आजारी व्यक्तीला असे स्वप्न पडले तर त्याचा अर्थ असा की तो लवकरच रोगापासून मुक्त होणार आहे.
- जर तुम्हाला स्वप्नात शनि मंदिर दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर शनिदेवाची खूप कृपा होणार आहे. असे स्वप्न एखाद्या व्यक्तीचे भाग्य उघडते. हे मोठ्या धनलाभाचे लक्षण आहे, तसेच काही महत्त्वाच्या कामात यश मिळण्याचे योग आहेत.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)
First published on: 14-03-2022 at 15:10 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These dreams have a direct relationship with shani dev know their good and bad results pvp