प्रत्येक राशीसाठी वेगवेगळी रत्ने विहित केलेली आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहांची स्थिती दाखवून नेहमी रत्ने धारण करायची असतात. कोणतीही माहिती नसताना रत्न धारण करू नये. असं नकळत रत्न धारण केले तर त्याचा नकारात्मक परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनात होतो. ज्योतिष आणि रत्न शास्त्रामध्ये चार रत्न अशी आहेत ज्यांना संपत्तीसाठी सर्वोत्तम मानले गेले आहे. तर जाणून घेऊया या रत्नांबद्दल अधिक माहिती.

१) सुवर्ण रत्न

सुवर्ण रत्नाला संपत्तीच्या दृष्टीने खूप खास मानले जाते. असे म्हणतात की ते धारण केल्याने घरात धनसंचय होते. या रत्नाला पुष्कराजाचा सब्सीट्यूट देखील म्हणतात. मात्र ते परिधान करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. यामुळे हे रत्न कसे परिधान करावे आणि कोणत्या राशीने करावे याचा सल्ला मिळतो.

shukra gochar 2024
आठ दिवसांनंतर शुक्र करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती मिळवणार भौतिक सुख
Ajche Rashibhavishya In marathi
२५ नोव्हेंबर पंचांग: सोमवारी ‘या’ तीन राशींवर बरसणार…
people birth on these date are fearless
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेले लोक कोणालाच घाबरत नाही; आयुष्यात भरपूर मिळतो पैसा
Horoscope
Weekly Lucky Horoscope : तूळ राशीसह ५ राशींना गजकेसरी राजयोगातून अचानक आर्थिक लाभ! करिअरमध्ये होईल प्रगती
Shadashtak Raja Yoga
‘या’ तीन राशींना शनी-मंगळ देणार बक्कळ पैसा; षडाष्टक राजयोगामुळे मिळणार प्रत्येक कामात यश
Mesh To Meen Horoscope 24 November
२४ नोव्हेंबर पंचांग: जोडीदाराची साथ ते जुन्या मित्रांची भेट, पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात १२ राशींचा असा जाईल रविवार
Chanakya Niti in Marathi
शाहण्या व्यक्तीने गाढवाकडून शिकाव्या ‘या’ तीन गोष्टी! वाचा चाणक्य निती काय सांगते?
Mangal Kark Rashi Parivartan 2024
नुसता पैसा; मंगळाच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रमोशन आणि धनसंपत्तीचे सुख

( हे ही वाचा: Pitru Paksha Shradh 2022: पितृपक्ष कधी सुरू होईल? तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा जाणून घ्या)

२) जेड स्टोन

जर काम तुमचे कोणतेही काम होत नसेल आणि तुमच्याकडे उत्पन्नाचे साधन नसेल, तुम्ही बेरोजगार असाल, तर जेड स्टोन एक अतिशय योग्य रत्न आहे. हे धारण केल्याने तुमचे नवीन कार्य सुरू होईल. तसंच यामुळे या रत्नांमुळे तुम्हाला धनप्राप्ती देखील होईल. मात्र, हे रत्न परिधान करतेवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

३) पन्ना रत्न

तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमची कन्या राशी असेल तर पन्ना रत्न तुमच्यासाठी खूप खास आहे. या राशीच्या लोकांनी पन्ना धारण करावा. ते धारण केल्याने पदोन्नती आणि नोकरीत सुख-समृद्धी येते. तसंच हे रत्न परिधान केल्याने तुम्हाला पैशांची कधीही कमतरता भासणार नाही.

( हे ही वाचा: मनी प्लांटशी संबंधित ‘हे’ उपाय करतील सुख-समृद्धीची भरभराट; जाणून घ्या)

४) पुष्कराज

पुष्कराज हे बृहस्पतिचे रत्न आहे. हे आनंदासाठी परिधान केले जाते. असे म्हणतात की हे रत्न धारण केल्याने जीवनात समृद्धी येते. मात्र, हे रत्न काही राशींसाठीच असते. त्या राशिवाल्यांनी परिधान केल्यानेच त्याचा फायदा होऊ शकतो. हे रत्न परिधान केल्यानंतर जीवनात भरभराट होते. या व्यक्तींना पैशांची कमी कधीही भासत नाही.