वास्तुशास्त्रात झाडे आणि वनस्पतींना विशेष असं महत्त्व दिले जाते. घरातील झाडे एकीकडे घराचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात, तर दुसरीकडे ते सकारात्मकताही आणतात. प्रत्येक झाडं घरात किंवा घराबाहेर लावले जात नाही असं वास्तूत जरी म्हटलं असलं, तरी काही झाडे अशी आहेत जी लावणे खूप शुभ मानले जाते. यापैकी एक मनी प्लांट आहे. मनी प्लांट घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की ज्या घरात मनी प्लांटचे रोप असेल तिथे पैशाची कमतरता नसते. वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटसह उपायांबद्दल काही खास गोष्टी आणि नियम सांगण्यात आले आहेत. त्याचा अवलंब केल्यास ते तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते. अशा परिस्थितीत आज आम्ही मनी प्लांटशी संबंधित एक चमत्कारी उपाय सांगणार आहोत, ज्याची काळजी घेतल्यास पैशाची कमतरता भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे तो चमत्कारिक उपाय?
वास्तूनुसार मनी प्लांटचे निश्चित उपाय जाणून घ्या
वास्तुशास्त्रात शुक्रवारी मनी प्लांटमध्ये लाल फिती किंवा लाल धागा बांधणे शुभ मानले जाते कारण लाल रंग हा कीर्ती आणि प्रगतीचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. दर शुक्रवारी हा उपाय केल्यास धनप्राप्तीसोबतच घरात सुख-समृद्धी नांदते. याशिवाय मनी प्लांटबद्दल असे सांगितले जाते की ही वनस्पती जसजशी वाढत जाते तसतशी व्यक्तीची प्रगती आणि उत्पन्न वाढते. त्यामुळे दर शुक्रवारी हा उपाय केल्यास, त्या व्यक्तीला आणि घराला पैशाची कमी कधीही भासणार नाही.
(हे ही वाचा: Astrology: यंदाचा पावसाळा तुमच्यासाठी ठरु शकतो लकी; ‘हे’ उपाय करून पहा)
मनी प्लांटशी संबंधित नियम जाणून घ्या
वास्तूनुसार मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला ठेवावा. या दिशेला ठेवणे खूप शुभ मानले जाते. तर चुकीच्या दिशेने लावलेला मनी प्लांट तुम्हाला अनेक संकटात टाकू शकतो. मनी प्लांटचे रोप कधीही जमिनीवर लावू नका किंवा त्याची पाने जमिनीकडे वाढू देऊ नका. मनी प्लांटचे रोप स्वच्छ ठिकाणी लावा. असं केल्यास, घरामध्ये आशीर्वाद राहतो. तसंच मनी प्लांटची नीट काळजी घेतल्यास, पैशाची कमतरता कधीही भासणार नाही.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)