नाव एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल बरेच काही सांगू शकते. कारण बहुतेक लोकांच्या नावाचे पहिले अक्षर त्यांच्या जन्म अक्षरानुसार ठेवले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार नावाच्या आधारे व्यक्तीच्या नशिबापासून त्याच्या स्वभावाविषयी बरेच काही जाणून घेता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

A: ज्या मुलींचे नाव ‘अ ‘ अक्षराने सुरू होते त्या त्यांच्या पतीसाठी अतिशय भाग्यशाली मानल्या जातात. या मुलींनी लग्न केलेल्या मुलाचे नशीबही चमकते. त्यांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळते, त्यामुळे या मुली कोणत्याही कामात यश मिळवतात. त्या आपल्या पतीला आनंदी ठेवतात आणि प्रत्येक परिस्थितीत त्याच्या पाठीशी उभ्या असतात.

आणखी वाचा : काश्मिरी पंडित व्यक्तीने बाळासाहेबांविषयी काय सांगितलं?; चिन्मय मांडलेकरने सांगितला ‘तो’ अनुभव

L : ज्या मुलींचे नाव ‘ल’ अक्षराने सुरू होते त्यांची समाजात वेगळी ओळख असते. या नावाचा मुली अंतःकरणातून शुद्ध आणि पवित्र असतात. इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. त्या आपल्या पतीवर खूप प्रेम करतात आणि त्यांना करिअरमध्ये यशस्वी होण्यासही भाग्यवान ठरतात. नशिबाची त्यांच्यावर नेहमीच विशेष कृपा असते.

आणखी वाचा : Oscar 2022 च्या स्टेजवर विल स्मिथने कानशिलात लगावलेला व्यक्ती कोण? जाणून घ्या

K : ज्या मुलींचे नाव ‘क’ अक्षराने सुरू होते, त्यांच्या मनात काहीही नसते आणि दृढनिश्चयी असतात. त्यांना समाजाच्या कल्याणासाठी चांगले काम करायला आवडते. त्या आपल्या स्वभावाने कोणाचेही मनं जिंकू शकतात. कोणत्याही कामात त्यांचा शंभर टक्के वाटा असतो. त्या आपल्या पतीचे नशीब बदलण्यासाठी भाग्यवान ठरतात.

आणखी वाचा : या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी काय पाहिले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व

P: ‘प’ अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली स्वभावाने अतिशय साध्या आणि भावनिक असतात. त्या बोलण्यात खूप चांगल्या असतात. त्या नशिबाने खूप श्रीमंत असतात, त्यामुळे लग्नानंतर आपल्या पतीचे भाग्य उजळण्याचे कारण बनतात.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)