October Month Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीवरून ऑक्टोबर महिना हा अत्यंत खास असणार आहे. कारण या महिन्यात ९ ग्रहांपैकी ६ ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. तसेच या वर्षीचे शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण याच महिन्यात लागणार आहे. सू्र्य आणि मंगळ सुद्धा काही राशींमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे काही लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होत असल्यामुळे मेष सह काही राशींना आर्थिक नुकसान होऊ शकते. करिअर आणि व्यवसायात त्यांना लाभ मिळू शकतो पण आईवडीलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या ऑक्टोबर महिन्यात कोणत्या राशींनी काळजी घ्यावी.
ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यात शनि हा त्याच्या मूळ त्रिकोण कुंभ राशी मध्ये आहे. केतू कन्या आणि राहु मीन राशीमध्ये आहे. तसेच ग्रहांचे राजकुमार बुध १० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी तुळ राशीमध्ये प्रवेश करणार. ग्रहांचे सेनापती मंगळ २० ऑक्टोबरला राशी कर्कमध्ये दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी प्रवेश करणार. तसेच शुक्र १३ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याशिवाय गुरू गुरुवार १० ऑक्टोबरला वृषभ राशीमध्ये उलट चाल चालणार आहे. चंद्र प्रत्येक अडीच दिवसानंतर राशी परिवर्तन करतो त्यामुळे तो १५ दिवस शुभ फळ आणि १५ दिवस अशुभ फळ देतो.
मेष राशी (Mesh Zodiac)
या मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि मंगळ २० ऑक्टोबर ला त्याच्या कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. प्रवेश केल्यानंतर मंगळ या राशीच्या चौथ्या स्थानावर विराजमान राहीन. या मुळे या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. धन पैशांची बचत करण्यात अडचणी येतील. गुरूच्या वक्रीमुळे खर्च वाढेल. शुक्र सुद्धा या राशींच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकतो. करिअर आणि व्यवसायासाठी हा महिना अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
ऑक्टोबर महिन्यात या राशीच्या लोकांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मंगळ गोचरमुळे या राशीच्या लोकांचे धनसंपत्तीचे नुकसान होऊ शकते. प्रत्येक कामात कोणती ना कोणती अडचण येऊ शकते. त्यामुळे हे लोक तणावात राहू शकतात. सूर्य तुळ राशीमध्ये असल्यामुळे गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. आरोग्यावर दुष्परिणाम दिसू शकतो. मान सन्मान कमी होऊ शकतो. पण करिअर आणि व्यवसायात या लोकांना फायदा होईल. हे लोक विदेशात नोकरी करण्याची संधी पूर्ण करू शकतात. जीवनात आनंद दिसून येईल.
सिंह राशी (Leo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिन्याची सुरूवात चांगली राहीन. पण महिन्याच्या मध्ये सूर्याने तुळ राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे या लोकांना अडचणीला सामोरे जावे लागू शकते. छोट्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आईवडीलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या लोकांना सतर्क राहणे गरजेचे आहे. या लोकांना नवीन नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तसेच या लोकांचा मान सन्माम कमी होऊ शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)