Goddess Maa Lakshmi Favorite Rashi : : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह कोणत्या ना कोणत्या राशीचा स्वामी असतो. त्याचप्रमाणे, प्रत्येक राशीचा स्वामी कोणती ना कोणती देवता असते. अशा परिस्थितीत, प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो. काही राशी आहेत ज्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. महालक्ष्मीच्या आशीर्वादामुळे सुख-समृद्धीसह प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. त्याच्या मदतीने हे लोक प्रत्येक आव्हानावर सहज मात करू शकतात. त्यांच्या बोलण्याच्या कौशल्याने त्यांना समाजात मान मिळतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा आहे…
वृषभ राशी
शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी मानला जातो. कुंडलीत शुक्राची स्थिती बलवान असेल तर त्या व्यक्तीला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो. याचबरोबक प्रणय, सुख आणि संपत्ती प्राप्त होते. माता लक्ष्मीच्या कृपेने या राशीचे लोक प्रत्येक आव्हानावर सहज मात करतात. त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. शुक्र ग्रहाच्या कृपेने या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. यामुळे या राशीचे लोक प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडतात.
कर्क राशी
या राशीचा स्वामी चंद्र आहे. हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. या राशीच्या लोकांचा स्वभाव खूप चांगला असतो. ते खूप मेहनती आणि समर्पित असतात. अशा स्थितीत या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. त्यांच्या मेहनतीमुळे ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून खूप नाव कमावतात. लक्ष्मी देवीच्या कृपेने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ते सहजपणे त्यांच्या इच्छा पूर्ण करतात.
वृश्चिक राशी
या राशीचा स्वामी मंगळ आहे. ग्रहांचा सेनापती असण्यासोबतच मंगळ हा आत्मविश्वास आणि धैर्याचा कारक मानला जातो. त्यामुळे या राशीचे लोक प्रत्येक काम इच्छाशक्तीने करतात. त्यांच्या उच्च आत्मविश्वासामुळे ते प्रत्येक क्षेत्रात प्रचंड उत्साह दाखवतात. यामुळे या राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असते. ते प्रत्येक काम कुशलतेने करतात.
सिंह राशी
या राशीचा स्वामी सूर्य आहे. अशा स्थितीत या राशीचे लोक सूर्यासारखे तेजस्वी आणि धैर्यवान असतात. या राशीचे लोक त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. याचबरोबर राशीच्या लोकांवर सूर्यदेवासह देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आहे, ज्यामुळे ते कोणत्याही आव्हानावर मात करून आनंदी जीवन जगतात. समाजात त्यांना आदर मिळते. तसेच त्यांना पद आणि प्रतिष्ठा मिळते.