Astrology : आपण दररोज अनेक लोकांना भेटतो. प्रत्येक व्यक्तीबरोबर आपली मैत्री होत नाही. काही खास लोक आपल्याला आवडतात. त्यांचा स्वभाव आपल्याला आवडतो. काही व्यक्ती पहिल्या भेटीतच आपले खूप चांगले मित्र होतात, तर काहीजणांना आपण वर्षानुवर्षे ओळखतो, पण त्यांच्याबरोबर आपले विचार जुळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींचे लोक एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकत नाही. या व्यक्ती नेहमी भांडत राहतात. त्या राशी कोणत्या? जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकर आणि मेष

मकर आणि मेष राशीचे लोक एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकत नाही. मकर राशीच्या व्यक्ती अत्यंत शांत आणि शिस्तप्रिय असतात, तर मेष राशीच्या व्यक्ती नेहमी बिनधास्त आणि बोलके असतात. यामुळे या दोन राशींचे एकमेकांबरोबर फारसे पटत नाही. मेष राशीचे लोक मकर राशीच्या व्यक्तीला त्यांच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात; त्यामुळे यांच्यामध्ये वारंवार वाद होऊ शकतो.

हेही वाचा : रस्त्यावर पडलेले पैसे उचलावे की नाही? असे पैसे सापडणे शुभ की अशुभ; जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते…

कुंभ आणि वृषभ

कुंभ राशीचे लोक खूप जास्त जिद्दी आणि स्वतंत्र विचारांचे असतात, ज्यामुळे त्यांना वृषभ राशीच्या व्यक्तीचा स्वभाव पटत नाही. या दोन राशींचे लग्न झाले किंवा ते एकमेकांचे जोडीदार बनले तर त्यांच्यामध्ये वारंवार छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडतात.

मीन आणि मिथुन

मीन राशीच्या लोकांचा स्वभाव खूप साधा असतो, तर मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव सहसा लवकर समजत नाही. मिथुन राशीचे लोक खूप स्वार्थी असतात, तर मीन राशीच्या व्यक्ती नेहमी इतरांचा जास्त विचार करतात. या दोन राशींचा स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध असल्यामुळे मीन आणि मिथुन राशींचे लोक सतत भांडतात.

हेही वाचा : Chanakya Niti : जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती? याचे महत्त्व समजून घेणारा कधीच आयुष्यात अयशस्वी होत नाही; वाचा, चाणक्य काय सांगतात?

मेष आणि कर्क

मेष राशीचे लोक जिद्दी स्वभावाचे असतात. कर्क राशीचे लोक खुल्या विचारांचे आणि नेहमी इतरांची काळजी घेणारे असतात. एकमेकांचा स्वभाव यांना पटत नाही, त्यामुळे एकत्र राहताना यांना अनेक अडचणी निर्माण होतात. मेष राशीचे लोक लवकर व्यक्त होतात, तर कर्क राशीचे लोक अनेक गोष्टी मनात ठेवतात आणि कधीच व्यक्त होत नाही.

मिथुन आणि कन्या

मिथुन राशीचे लोक खूप जास्त स्पष्ट बोलतात. त्यामुळे अनेकदा ते समोरच्या व्यक्तीला दुखावतात. या उलट कन्या राशीच्या व्यक्ती शांत स्वभावाच्या असतात. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना कन्या राशीचे लोक बोरिंग वाटतात. मिथुन राशीच्या व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या असतात, तर कन्या राशीचे लोक संकुचिक स्वभावाचे असतात. त्यामुळे यांच्यामध्ये मतभेद दिसून येतात.

कर्क आणि तुळ

कर्क राशीचे लोक खूप जास्त प्रामाणिक आणि संवेदनशील असतात, तर तुळ राशीच्या लोकांमध्ये दिखाऊपणा अधिक असतो. त्यामुळे या राशींमध्ये वारंवार वाद होतात.

हेही वाचा : Guru Vakri 2023 : गुरूच्या वक्री चालीमुळे तीन राशी होणार मालामाल? वाचा ज्योतिषशास्त्र काय सांगते ….

धनु आणि मीन

धनु राशीचे लोक दिलखुलास स्वभावाचे असतात आणि मीन राशीचे लोक आपल्याच दुनियेत मग्न असतात. धनु राशीचे व्यक्ती दुसऱ्यांचा विचार न करता अनेकदा कठोर निर्णय घेतात, तर मीन राशीचे लोक खूप भावनिक असतात. त्यामुळे या लोकांना एकमेकांना समजून घेणे खूप कठीण जाते.

सिंह आणि वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोक जिद्दी स्वभावाचे असतात, तर सिंह राशीचे व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाचे असतात. दोन्ही राशींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. त्यामुळे ते एकमेकांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेकदा त्यांच्यामध्ये मतभेद वाढू शकतात.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These zodiac signs never be good couple they always fight with each other read what astrology said ndj
Show comments