Budh Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने १ ऑगस्टला पहाटे ३:४५ वाजता कर्क राशी सोडली आहे आणि सिंह राशीत प्रवेश केला आहे. २१ ऑगस्टपर्यंत बुध सिंह या राशीत राहील. त्यानंतर, ते पुन्हा संक्रमण होईल. काही राशींना बुध ग्रहाच्या या संक्रमणामुळे बरेच फायदे होतील. त्याच वेळी, अनेक राशीच्या लोकांच्या जीवनावर वाईट प्रभाव पडेल. जाणून घ्या बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशीच्या जीवनावर वाईट परिणाम होईल.
वृषभ राशी
या राशीच्या लोकांसाठी बुधाचा राशी बदल संमिश्र असणार आहे. या राशीच्या लोकांनी करिअरबाबत थोडे सावध राहिले तर बरे होईल. यासोबतच पैशाशी संबंधित समस्या असू शकतात. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक अडचणीवर सहज मात कराल.
( हे ही वाचा: Shani Dev: ‘या’ राशींच्या कुंडलीत तयार होत आहे महापुरुष राज योग; तीन महिने होईल पैशाचा पाऊस)
कर्क राशी
बुधाने राशी बदलून, सूर्य सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर, तो या राशीच्या दुसऱ्या घरात आला आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहा. कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. कुटुंबाच्या सुखासाठी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करणे शुभ राहील.
मकर राशी
मकर राशीचा स्वामी शनि आहे. अशा स्थितीत बुधाशी शनिचा संबंध शत्रुत्वाचा असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण चांगले राहणार नाही. कोणतेही काम काळजीपूर्वक केले तर ते अधिक चांगले होईल. यासोबतच गाडी चालवताना थोडी काळजी घ्या, अन्यथा अपघाताला सामोरे जावे लागू शकते.
( हे ही वाचा: श्रावण सोमवार व्रत 2022: श्रावण सोमवारी आवर्जून करा ‘या’ मंत्राचा जप; जाणून घ्या पूजेची विधी आणि महत्व)
मीन राशी
बुधाचे संक्रमण या राशीच्या सहाव्या भावात आहे. या राशीच्या चौथ्या आणि सातव्या घराचा स्वामी बुध आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा, ते चांगले होईल. यासोबतच आरोग्याची पूर्ण काळजी घ्या.