कोणतेही नाते विश्वासावर टिकते. त्यामुळे कोणत्याही नात्यात विश्वास असेल, तर ते अनेक वर्षे टिकते. पण, आजकालच्या स्वार्थी जगात कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवणे अवघड असते. परंतु, ज्योतिषशास्त्रात (Astrology) अशा काही राशी आहेत; ज्या अत्यंत विश्वासू (faithful zodiac) आहेत. या राशीच्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. जाणून घेऊ या कोणत्या राशी आहेत?
‘या’ चार राशींचे लोक असतात अत्यंत विश्वासू
१) वृषभ
विश्वासू राशींच्या यादीत वृषभ राशीचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. या राशीचे लोक इतरांमध्ये लवकर मिसळतात. व्यावहारिक असण्याबरोबर ते मनापासून मैत्री जपतात. या राशीच्या लोकांमध्ये अनेक गुण असतात. तसे ते त्यांचे मत उघडपणे व्यक्त करतात; परंतु इतरांच्या मतामध्ये ते हस्तक्षेप करीत नाहीत. ते तुमच्या गुपित गोष्टी नेहमी मनात ठेवतात; पण कधी इतरांना सांगत नाहीत. ते बाहेरून जसे दिसतात, तसे ते आतूनही असतात. ते प्रत्येक मुद्द्यावर बेधडकपणे आपले मत मांडतात. लोकांना त्याच्या काही गोष्टी पटत नाही; पण ते विश्वासू व्यक्ती असल्याने लोक त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात.
२) मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना मित्र बनवणे आवडते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशीही ते बिनदिक्कतपणे बोलतात. त्यांचा हा गुण अनेकांना फार आवडतो. मिथुन राशीचे लोक त्यांच्या सभोवतालच्या लोकांना आपलेसे करून घेतात. त्यामुळे त्यांना अनेक गुपित गोष्टी सांगताना कोणाला संकोच वाटत नाही. मैत्री झाल्यानंतर अनेक जण त्यांना आपल्या गोष्टी सांगतात; पण या गोष्टी ते दोघांमध्येच ठेवतात. मैत्रीतील विश्वास न तोडण्याबरोबरच ते अनोळखी व्यक्तींनाही कधीच चुकीचा सल्ला देत नाहीत. या गुणामुळेच ते मित्रांचा आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांचा विश्वास जिंकतात. त्यांचा मित्र परिवार खूप मोठा असतो आणि त्यातील बहुतेक लोक त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात.
३) तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीचे लोक विश्वासार्ह आणि चांगले मित्र असतात. ते त्यांच्या जवळच्या किंवा मित्रांच्या गुपित गोष्टी त्यांच्या मनात ठेवतात. ते कधी कोणाचा विश्वास तोडत नाहीत आणि कठीण प्रसंगी कुणाची साथ सोडत नाहीत. कोणालाही भेदभावाची वागणूक देत नाहीत. ते कोणतंही नातं अगदी प्रामाणिकपणे निभावतात. ते इतरांकडून होणारी टीका अतिशय काळजीपूर्वक ऐकतात. गरज असेल तेव्हा आपल्यात बदल करतात, खूप विचार करतात. या राशीचे लोक बोलण्यात आणि विचार शेअर करण्यात खूप चांगले मानले जातात. ते पूर्णत: प्रामाणिकपणे लोकांना योग्य सल्ला देतात.
४) मीन
मीन राशीचे लोक मनापासून मैत्री जपतात. त्यामुळे कधी कधी त्यांचे नुकसानदेखील होते. ते अनोळखी व्यक्तींबरोबरही लगेच मैत्री करतात. मीन राशीचे लोक कोणत्याही गोष्टीचा खोलवर विचार करतात. चांगल्या गोष्टींना ते नेहमी समर्थन देतात. ते विश्वासू असतात. लोकांनी शेअर केलेल्या अनेक पर्सनल गोष्टी ते कधी इतरांबरोबर शेअर करीत नाहीत. एकाची गोष्ट दुसऱ्याला सांगण्याची चूक ते कधीच करीत नाहीत. तसेच, कोणाच्या गुप्त गोष्टी जाणून घेतल्यानंतर ते त्याचा कधीच फायदा घेत नाहीत.
(अस्वीकरण : वर दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता.कॉम याची पुष्टी करीत नाही.)