ज्याप्रकारे आचार्य चाणक्य यांच्या नीती आजही तितक्याच प्रासंगिक आणि उपयोगी आहेत, त्याचप्रमाणे महाभारताच्या काळातील महान बुद्धिजीवी महात्मा विदुर यांच्या नीती देखील आजही कामी येतात. महात्मा विदुर कुशाग्र बुद्धीचे स्वामी होते. तसेच, ते दूरदर्शी सुद्धा होते. त्यांनी महाभारताच्या युद्धाच्या परिणामांबद्दल महाराजा धृतराष्ट्र यांना आधीच कल्पना दिली होती. परंतु तरीही कौरवांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि युद्धामुळे झालेले नुकसान सर्वांनाच सहन करावे लागले. आज आपण विदुर नीतीमध्ये सांगितलेल्या त्या कामांबद्दल जाणून घेऊया ज्यांना मूर्ख समजले जाते. तसेच हे काम करणारी व्यक्ती कधीच प्रगती करू शकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदुर यांच्यानुसार, काही गोष्टी अशा असतात की, ती करणारा माणूस स्वतःला कितीही हुशार समजत असला तरी तो मूर्खाच्या श्रेणीत येतो. खास करून स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारणारा व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही. इतरांसमोर तो कितीही हुशार असला तरी प्रत्यक्षात तो मूर्खच असतो. आयुष्यात तोच माणूस प्रगती करतो जो आपली चूक मान्य करतो आणि ती सुधारतो. जो माणूस आपल्या चुकीचा दोष इतरांना देतो, तो त्याच चुका करत राहतो आणि आयुष्यात कधीच पुढे जात नाही.

‘या’ ४ राशींसाठी हा व्हॅलेंटाइन वीक ठरणार अविस्मरणीय; होईल प्रेमाचा वर्षाव

असे लोक जे स्वत: कोणतेही काम करण्यास अयोग्य असतात परंतु इतरांच्या कामात दोष शोधतात आणि त्यांच्यावर रागावतात, ते देखील मूर्ख असतात. आधी स्वत: काहीतरी करून मगच इतरांच्या कामात दोष शोधणे चांगले. जे लोक स्वत: काम करत नाहीत त्यांनी इतरांवर रागावणे किंवा त्यांच्या कामात चुका शोधणे व्यर्थ आहे कारण त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This person can never be successful in life many obstacles along way pvp