काल ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक सुरु झाला व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी अनेक कपल्स वेगवेगळ्या योजना आखत आहेत. आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी शक्कल लढवत आहेत. प्रेमींसाठी हा पूर्ण आठवडा एखाद्या सणापेक्षा कमी नाही. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या प्रेमी जोडप्यांसाठी हा आठवडा अद्भूत आणि अविस्मरणीय असेल. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मिथुन रास :
हा व्हॅलेंटाइन या राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास असणार आहे. या व्यक्ती आपले प्रेम सुद्धा जाहीर करतील तसेच याबद्दल त्यांना आपल्या जोडीदाराकडून चांगला प्रतिसाद देखील मिळेल. लग्न करू इच्छिणारे जोडपे आपल्या जोडीदाराची कुटुंबाशी ओळख करून देऊ शकतात. त्याचबरोबर विवाहित जोडप्यांसाठीही हा व्हॅलेंटाइन वीक प्रेम वाढवणारा ठरणार आहे.
खोटं बोलण्यात पटाईत असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; कधीही देऊ शकतात धोका
कर्क रास :
कर्क राशीच्या प्रेमी जोडप्यांचे लग्न होण्याची शक्यता आहे. साखरपुडा किंवा लग्न ठरू शकते. विवाहित जोडपे एकमेकांना सहकार्य करतील. यामुळे त्यांचे नाते घट्ट होईल. प्रणय वाढेल.
सिंह रास :
सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातही प्रेमाचा वर्षाव होईल. विवाहित आणि अविवाहित जोडप्यांचे नाते अधिक घट्ट होईल. ज्या जोडप्यांचे कुटुंबीय लग्नाला सहमत नव्हते ते आता सहमत होऊ शकतात. एखाद्यासमोर प्रेम व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे.
तुमची पैशांची तिजोरी घराच्या ‘या’ दिशेला तर नाही ना? वायफळ खर्चात होऊ शकते वाढ
कन्या रास :
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप आनंदाचा असेल. जे एकटे आहेत त्यांना जोडीदार मिळू शकेल. जोडप्यांमध्ये प्रेम-प्रणय वाढेल. तुम्ही कुठेतरी अविस्मरणीय सहलीला जाऊ शकता.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)