अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने, चांदीसारखे महागडे धातू खरेदी करण्याची परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेला धातूच्या रूपात देवी लक्ष्मीला आपल्या घरी आणले जाते, जेणे करून या दिवशी मिळालेली संपत्ती, पुण्यफळ इत्यादी नष्ट होऊ नये. यावर्षी अक्षय्य तृतीया मंगळवार, ३ मे रोजी साजरी होणार आहे. या दिवशी प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार सोने, चांदी किंवा इतर दागिने खरेदी करायचे असतात. तथापि, अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या राशीनुसार धातू खरेदी करू शकता, जे तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राशीनुसार कोणते धातू खरेदी करणे फायदेशीर ठरेल.
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तांबे किंवा सोने खरेदी करणे शुभ राहील. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ ग्रहासाठी तांबे शुभ धातू आहे.
वृषभ : या राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे. अक्षय्य तृतीयेला चांदी खरेदी करणे या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. हिरा हे शुक्राचे मुख्य रत्न मानले जाते.
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह बुध आहे. यामुळे अक्षय्य तृतीयेला मिथुन राशीचे लोक पितळेची भांडी किंवा दागिने खरेदी करू शकतात.
कर्क : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कर्क राशीच्या लोकांनी चांदीची खरेदी करणे चांगले राहील. या राशीचा अधिपती ग्रह चंद्र आहे, त्यामुळे चांदी तुमच्यासाठी शुभ राहील.
सिंह: सिंह राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे. या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेला तांबे किंवा सोने खरेदी करावे. तथापि तांब्याची खरेदी जास्त उत्तम ठरेल.
कन्या : कन्या राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेला कांस्य खरेदी करणे देखील शुभ राहील.
तूळ : तूळ राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेला चांदीची खरेदी करावी. या राशीचा शासक ग्रह शुक्र आहे.
वृश्चिक : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तांबे खरेदी करणे चांगले राहील. या राशीचा स्वामी मंगळ ग्रहाचा शुभ धातू तांबे आहे.
धनु: धनु राशीचा शासक ग्रह गुरु आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी पितळ किंवा सोने खरेदी करणे चांगले राहील.
मकर: अक्षय्य तृतीयेला मकर राशीच्या लोकांनी स्टील किंवा लोखंडी भांडी खरेदी करणे चांगले राहील कारण या राशीचा अधिपती शनिदेव आहे.
कुंभ : या राशीच्या लोकांनी देखील मकर राशीप्रमाणे स्टील किंवा लोखंडी भांडी खरेदी करावी. कारण या राशीचा अधिपतीही शनिदेव आहे.
मीन: या राशीचा अधिपती ग्रह गुरु आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मीन राशीच्या लोकांसाठी पितळ खरेदी करणे शुभ राहील. त्यांना हवे असल्यास ते सोनेही खरेदी करू शकतात.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)