वास्तुशास्त्राचा निसर्गाच्या सर्व गोष्टींशी जवळचा संबंध मानला जातो. प्रत्येक ऋतूसाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय आपल्या दैनंदिन जीवनात आनंद घेऊन येत असतात. त्यामुळे त्या त्या ऋतूनुसार वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय वापरले पाहिजेत. याने नक्कीच फायदा मिळतो.आता पावसाळा ऋतू येणार आहे, अशा परिस्थितीत तुम्ही काही सोपे वास्तु उपाय अवलंबावेत. जेणेकरून तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडतील. पावसाळ्यात जर तुम्ही हे उपाय केले, तर तुम्हाला नक्कीच दररोजच्या जीवनात फरक जाणवेल. तर जाणून घेऊया पावसाळ्यात करायचे उपाय ज्यामुळे तुमच्या अनेक अडी-अडचणी दूर होतील. जाणून घ्या.
१) जर तुम्ही कर्जामध्ये डुबले असाल, तर पावसाच्या पाण्याने तुमचे कर्ज कमी होऊ शकते. यासाठी पावसाचे पाणी एका बादलीत गोळा करा आणि पावसाच्या पाण्यात एक ग्लास दूध घाला.आता या पाण्याने आंघोळ करा.या उपायामुळे लवकरच कर्जमाफी होईल,असा विश्वास आहे.
२) पावसाच्या पाण्याने माँ लक्ष्मीची पूजा केल्यास धनलाभ होण्यास सुरुवात होते, असेही मानले जाते. यासाठी पितळेच्या भांड्यात पावसाचे पाणी गोळा करून लक्ष्मीचा जलाभिषेक करावा. शुक्रवारी हा उपाय करण्याचे विशेष महत्त्व आहे. यावेळी माँ लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करायला विसरू नका.
( हे ही वाचा: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी येणारे ६ दिवस असतील खूपचं शुभ; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही)
३) जर तुम्हाला आर्थिक संकटाने घेरले असेल तर मातीचे भांडे घेऊन त्यात पावसाचे पाणी भरावे आणि घराच्या उत्तर दिशेला घागर ठेवावी. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते.
४) वैवाहिक जीवनात मतभेद असल्यास काचेच्या बाटलीत पावसाचे पाणी भरावे.ही बाटली काही दिवस बेडरूममध्ये ठेवा. अस केल्यास वैवाहिक मतभेत कमी होतील आणि जोडप्यामध्ये गोडवा निर्माण होईल.
५) त्वचेशी संबंधित आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पावसाच्या पाण्यात हळद मिसळा आणि या पाण्याने आंघोळ करा.
६) पावसाळ्यात मधाचा वापर विशेष फायदेशीर मानला जातो. तसंच ज्या दिवशी पाऊस पडतो आणि ओलावा असतो, त्या दिवशी हलका आहार घ्यावा.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)