Shash And Kendra Tirkon Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात आणि शुभ आणि राजयोग तयार करतात, ज्यामुळे मानवी जीवनावर परिणाम होतो. तब्बल २०० वर्षांनंतर एकाच वेळी ३ राजयोग तयार झाले आहेत. कारण यावेळी बुध आणि शुक्र सिंह राशीत भ्रमण करत आहेत आणि शनिदेव समोर आहे. त्यामुळे समसप्तक राजयोग तयार होत आहे. या तीन ग्रहांसह केंद्र त्रिकोण राजयोगही तयार झाला आहे. तसेच, सश राजयोग आधीच तयार झाला आहे. या ३ राजयोगांच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच, या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
वृषभ राशी
३ राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण तुमच्या राशीमध्ये मंगळ आणि गुरूची युती होत आहे. तसेच शुक्र आणि बुध तुमच्या चौथ्या घरात स्थित आहेत. तसेच शनिदेव समोर बसून शश राजयोग निर्माण करत आहेत. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच, यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच, हा कालावधी तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता.
सिंह राशी
तीन राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण सूर्य आणि शुक्र हे ग्रह तुमच्या राशीमध्ये स्थित आहेत. तसेच, शनिदेव त्यांच्या समोर पश्चिम दिशेला मजबूत बसलेले आहेत. तसेच शश राजयोगही तयार होत आहे. तुमच्या गोचर कुंडलीत दहाव्या घरात बुध आहे. त्यामुळे तुमच्या मनोकामना यावेळी पूर्ण होतील. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या शब्दांच्या जोरावर तुम्ही खूप मोठी गोष्ट साध्य करू शकता. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नही वाढेल.
हेही वाचा – ऑगस्टमध्ये त्रिग्रही राजयोगामुळे ‘या राशीच्या लोकांचे नशीब पूर्णपणे बदलेल, मिळेल आनंदाचा खजिना
वृश्चिक राशी
तीन राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण गुरू आणि मंगळ तुमच्या सातव्या घरात बसले आहेत. तसेच शनि राजयोग तयार करून चतुर्थ भावात विराजमान आहे. तर शुक्र आणि बुध दहाव्या घरात स्थित आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला प्रॉपर्टीच्या व्यवहारात फायदा होऊ शकतो. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात लोकप्रियतेतही वाढ होईल. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळेल. त्याचबरोबर शेअर बाजार, आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती करू शकता. कारण लाभाची शक्यता आहे.