विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावण यांचा वध करुन विजय मिळवला होता. यंदा २४ ऑक्टोबर २०२३ रोजी विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाची पूजा केली जाते. ज्योतिष्य शास्त्रानुसार, यंदाचा दसरा खास असणार आहे. कारण, या दिवशी शुभ संयोग घडून येणार आहे. शनिदेव आपल्या स्वराशी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ‘शश राजयोग’ तयार होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि गुरु एकमेकांसमोर येत असल्याने ‘धन योग’ निर्माण होणार आहे. यासोबतच तूळ राशीत सुर्य आणि बुधदेवाची युती होणार असल्याने ‘बुधादित्य राजयोग’ घडणार आहे. एका वेळेस अनेक शुभ राजयोग निर्माण होत असल्याने काही राशींचे नशीब सोन्याहून अधिक चमकण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे नशीब सोन्याहून अधिक चमकणार?
कर्क राशी
कर्क राशीच्या मंडळींना शुभ संयोग घडून आल्याने मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित काही निर्णयांमुळे या राशीतील लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. या राशीच्या लोकांना या काळात वाहन आणि मालमत्ता मिळू शकते. दुसरीकडे, नोकरदार लोकांना बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या काळात परदेश प्रवासाचीही शक्यता निर्माण होत आहे.
(हे ही वाचा : २०२४ पासून ‘या’ राशीतील लोकांचे सुखाचे दिवस सुरु? देवगुरुच्या कृपेने धनलाभ होऊन राजकारणी लोकांना मिळू शकतो पद )
तूळ राशी
तूळ राशीत बुधादित्य राजयोग घडणार असल्याने या राशीतील लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. या राशीतील लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढून सामाजिक सन्मान वाढण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. या राशीतील लोकांना अचानक पैसे मिळू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी
या राशीत शनिदेव विराजमान होणार असल्याने कुंभ राशीतील लोकांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. पैशाचे संकट दूर होऊन या राशीच्या लोकांची आर्थिक बाजू भक्कम होऊ शकते. या काळात रखडलेला पैसाही मिळू शकतो. शैक्षणिक स्पर्धेशी संबंधित लोकांना परीक्षेत यश मिळू शकते. या राशीतील विवाहित लोकांना संतानसुख मिळू शकते. या काळात तुमची जोरदार प्रगती होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)