ज्योतिषशास्त्रात नवग्रह हा महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. या ग्रहांचा मानवी जीवनावर बरा वाईट परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. एका विशिष्ट कालावधीत ग्रह राशी परिवर्तन करत असतात. ग्रह वेळोवेळी राजयोग तयार करतात, ज्याचा प्रभाव पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर दिसून येतो. यातच डिसेंबरमध्ये ३ राजयोगाचा योग आहे. यात मंगळ देव ‘रुचक राजयोग’, शनिदेव ‘शश राजयोग’ आणि शुक्रदेवाचा ‘मालव्य राजयोग’ काही राशींना शुभ परिणाम देण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या राशींना मिळू शकतो लाभ….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींना मिळणार लाभ?

वृषभ राशी

रुचक राजयोग आणि शश राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. येत्या नवीन वर्षात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकते. याशिवाय जे लोक परदेशात नोकरीसाठी जाण्यास इच्छुक आहेत त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मान-प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेले लोकं असतात फार रागीट? पण कमी वयात होतात गडगंज श्रीमंत!)

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना तीन शुभ राजयोगांचा फायदा होऊ शकतो. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित नवीन काम सुरू केल्यास काही दिवसांत यांचे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. पसंतीच्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो. तुमच्या कुटुंबाची भरभराट होऊ शकते.

कुंभ राशी

तीन शुभ राजयोग बनल्याने कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडून येऊ शकतात. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. व्यापारी वर्गाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. सुवर्णसंधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच परदेशात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात नवीन वाहन खरेदीची योजना पूर्ण होऊ शकते. प्रेम आणि वैयक्तिक जीवन चांगले राहू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three rajyog made after 30 years these zodiac signs bank balance to raise money marathi astrology pdb