Budh Gochar 2023 in Kanya: बुध ग्रहाला बुद्धी, व्यापार, वाणी व धनाचा कारक मानले जाते. जेव्हा बुध गोचर होते तेव्हा त्याचा प्रभाव कमी-अधिक, शुभ-अशुभ स्वरूपात प्रत्येक राशीवर दिसून येतो. जेव्हा बुध उच्च राशीत असतो तेव्हा त्याचा फायदा विशेषतः व्यवसाय, व्यापार व गुंतवणूक अशा माध्यमातून समोर येतो. अलीकडेच कन्या राशीत बुध ग्रहाचे गोचर झाले आहे. १ ऑक्टोबर २०२३ ला बुधाने गोचर करून कन्या राशीत प्रवेश केला होता. वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनुसार, १९ ऑक्टोबर पर्यंत बुध कन्या राशीतच राहणार आहे. यामुळे ३ राशींना १९ ऑक्टोबर पर्यंत कालावधी अत्यंत धनलाभाचा व सुखाचा असणार असल्याचे दिसतेय. तुमची रास यात आहे का व असल्यास तुम्हाला नेमका काय व कसा लाभ होणार हे पाहूया.

१९ ऑक्टोबर पर्यंत सोनेरी दिन ! बुध गोचराने पालटतील तुमचे दिवस

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

बुध गोचर वृषभ राशीच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक असू शकते. या मंडळींच्या कुंडलीत बदलाचे संकेत आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुद्धा बदलण्यामागे नोकरीत किंवा व्यवसायात बदल होणार असल्याचे दिसत आहे. तुम्हाला पूर्णपणे तुमच्या कार्याची कक्षा व मार्ग बदलता येणार आहे. तुमच्या कामाचे प्रचंड कौतुक होऊ शकते. गुंतवणुकीतून फायदा आहे पण मार्ग विश्वासाचा निवडा. तुम्ही कुटुंबासह काही खास क्षण अनुभवू शकता, त्यामुळे मन आनंदी व मूड फ्रेश राहील.

laxmi narayan yog
तब्बल १२ वर्षानंतर मीन राशीत निर्माण होणार ‘लक्ष्मी नारायण योग’; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Margashirsha Purnima 2024 15 december horoscope marathi
१५ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष पौर्णिमेला कोणत्या राशींना होईल अचानक…
mangal chandra gochar 2024 maha bhagya rajyog
मंगळ-चंद्राच्या युती झालेल्या महाभाग्य राजयोगाने ‘या’ तीन राशींवर होईल पैशांचा पाऊस! मिळणार पद, प्रेम अन् सन्मान?
The luck of these 3 zodiac signs will shine in 2025 With the grace of Lord Shiva
२०२५मध्ये या ३ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार! महादेवाच्या कृपेने मिळणार पैसा आणि मान-सन्मान
Venus Transit in dhanishta nakshatra
२२ डिसेंबरपासून नुसता पैसाच पैसा; शुक्राच्या धनिष्ठा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर श्री दत्त गुरूंची असणार कृपा; धनसंपत्तीत वाढ तर व्यापारी वर्गाला होईल भरपूर लाभ
january 2025 Monthly Horoscope 2025
Lucky Rashi Of January 2025: २०२५ च्या जानेवारी महिन्यात ‘या’ राशींना होणार बंपर लाभ; मिळणार नोकरीत बढती, बक्कळ पैसा अन् संपत्ती
Shani in Meen 2025
शनी ‘या’ तीन राशींना देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील राशी परिवर्तनाने देवी लक्ष्मी होणार प्रसन्न
Shukra Gochar 2024 :
Shukra Gochar 2024 : २८ डिसेंबर पासून या राशींना मिळणार पैसाच पैसा, पालटणार ‘या’ पाच राशींच्या लोकांचे नशीब; होणार दुप्पट नफा

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

सिंह राशीच्या मंडळींसाठी बुध गोचर सोन्याचे दिवस घेऊन येत आहे. या मंडळींना दागदागिने खरेदी करायची संधी मिळू शकते. तुमची आवक वाढू शकते. पण तितकाच खर्च सुद्धा वाढताना दिसत आहे. खर्च करताना मनात दुःख ठेवू नका अन्यथा तुम्ही करत असलेली खरेदी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. मन शांत ठेवून निर्णय घ्या. मेंदूच्या जोडीने मनाला या काळात अधिक प्राधान्य देणे फायद्याचे ठरू शकते. तुम्हाला १९ ऑक्टोबरच्या आधीच एखाद्या मोठ्या स्वप्नाची पूर्ती करता येऊ शकते.

हे ही वाचा<< २०२४ आधी मोदी, गांधी, कुमार, बॅनर्जी यांचे कष्ट वाढवणार ‘राहू’! ज्योतिषांनी मांडली १० मोठ्या नेत्यांची कुंडली

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)

बुध गोचर वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी आर्थिक मिळकत वाढवणारे माध्यम ठरणार आहे. मुख्य म्हणजे तुम्ही कमावलेले पैसा चैनीसह गुंतवणूक व बचतीसाठीही वापरता येईल इतक्या मोठ्या प्रमाणात असू शकतो. एखाद्या यात्रेला जाण्याची संधी मिळू शकते. अनेक गोष्टी अचानक ठरतील- घडतील यामुळं तुमच्या आयुष्यला गती मिळू शकते. अनेक दिवसांपासून सुरु असणारी मरगळ निघून जाईल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader